Gold Rate : भारतात सोनं 10 हाजाराने स्वस्त, पण पाकिस्तानमध्ये काय परिस्थीती? तिथे 1 तोळं सोन्याचा भाव किती?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मागच्या काही महिन्यात सोन्यानं असा काही उच्चांक गाठला की सोनं घेणं सामान्य लोकांच्या आवाका बाहेर जाऊ लागलं.
मुंबई : सोनं म्हणजे भारतीयांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग. लग्नसमारंभ असो, सणवार असो किंवा गुंतवणुकीचा विषय सोनं नेहमीच सुरक्षिततेचं आणि परंपरेचं प्रतीक राहिलं आहे. भारतीय लोक आजही सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहातात. शिवाय लग्न समारंभात तर सोनं हवंच असा आग्रह असतो. मागच्या काही महिन्यात सोन्यानं असा काही उच्चांक गाठला की सोनं घेणं सामान्य लोकांच्या आवाका बाहेर जाऊ लागलं.
पण नंतर सोन्याचा दर खाली ही उतरला. गेल्या काही दिवसांपासून देशभरात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, केवळ 10 दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ₹10,000 पेक्षा जास्त घट नोंदवली गेली आहे. पण असं असलं तरी देखील सामान्यांसाठी सोनं अजूनही महागच आहे.
मग प्रश्न असा की, जेव्हा भारतात सोनं स्वस्त होत आहे, तेव्हा आपल्या शेजारील देश पाकिस्तानात परिस्थिती कशी आहे? तिथं सोन्याचे दर कोणत्या स्तरावर पोहोचले आहेत? चला, जाणून घेऊया दोन्ही देशांतील एक तोळा सोन्याचे ताजे दर आणि त्यामागचं आर्थिक गणित.
advertisement
भारतातील सोन्याचे दर
सध्या भारतात स्थिर आर्थिक परिस्थिती आणि नियंत्रणात असलेल्या महागाईमुळे सोन्याच्या किंमतीत सौम्यता दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹1,20,419 इतका आहे. एका तोळ्याचं वजन साधारणतः 11.66 ग्रॅम मानलं जातं, त्यामुळे 24 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याची किंमत सुमारे ₹1,39,839 इतकी ठरते. तर 22 कॅरेट सोन्याचा दर सध्या ₹1,10,300 प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
advertisement
पाकिस्तानातील सोन्याचे दर
पाकिस्तानातही अलीकडे सोन्याच्या किंमतीत थोडीशी घसरण झाली आहे. तरीदेखील तिथं सोनं इतकं महाग आहे की भारतात त्या किंमतीत एखादी छोटी गाडी खरेदी करता येईल. पाकिस्तानात सध्या 24 कॅरेट सोन्याचा एक तोळा सुमारे 4,20,500 पाकिस्तानी रुपये इतका आहे, तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 3,60,520 पाकिस्तानी रुपये आहे.
पाकिस्तानात सोनं इतकं महाग का?
यामागचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था अस्थिर असणं. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयात मोठी घसरण झाल्याने आयातीत सोनं महाग पडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत डॉलरमध्ये ठरते, त्यामुळे रुपया कमजोर झाला की स्थानिक बाजारात दर आपोआप वाढतात.
advertisement
त्याशिवाय उच्च महागाई हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. रोजच्या गरजेच्या वस्तू महाग झाल्यावर लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात. त्यामुळे मागणी वाढते आणि किंमती अधिक चढतात. याशिवाय आर्थिक अनिश्चितता, आणि परकीय चलन साठ्याची कमतरता हे घटकही पाकिस्तानातील सोन्याच्या दरवाढीमागे मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत.
भारताच्या तुलनेत पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असताना भारतात मजबूत चलन, संतुलित वित्तीय धोरणं आणि नियंत्रित महागाई यामुळे सोन्याचे दर तुलनेने स्थिर राहतात. परिणामी दोन्ही देशांमधील सोन्याच्या किंमतीत मोठं अंतर दिसून येतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 7:18 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Rate : भारतात सोनं 10 हाजाराने स्वस्त, पण पाकिस्तानमध्ये काय परिस्थीती? तिथे 1 तोळं सोन्याचा भाव किती?


