नव्या GSTमुळे किती वाचणार? 20 लाखांच्या घरावर होणार इतकी बचत, 22 सप्टेंबरनंतरचे गणित असे आहे

Last Updated:

GST Cut On Building Materials: सिमेंट, विटा आणि टाईल्सवरील जीएसटी कपात झाल्याने घर खरेदीदारांना थेट बचतीचा फायदा होणार आहे. एका सरासरी घरावर 40 ते 50 हजारांपर्यंतची बचत होईल, तर फ्लॅट खरेदीत लाखोंची बचत होऊ शकते.

News18
News18
मुंबई: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बांधकाम साहित्यावरील जीएसटीमध्ये मोठी कपात केली आहे. यामुळे आता घर बांधणे अधिक स्वस्त होणार आहे. सिमेंट, विटा, फरशा (टाईल्स) आणि दगडांच्या फिटिंग्जवरील जीएसटी कमी करण्यात आल्याने, थेट ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
advertisement
जीएसटी परिषदेने सिमेंटवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत, तर विटा, फरशा आणि दगडांच्या फिटिंग्जवरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत कमी केला आहे. हे बदल सप्टेंबर महिन्यापासून लागू झाले आहेत.
advertisement
घर बांधणीचा खर्च कमी होणार
स्वत:चे घर बांधणाऱ्या कुटुंबांना या निर्णयाचा थेट फायदा होईल. अंदाजे 20 लाख रुपये खर्चून तयार होणाऱ्या घरासाठी आता जीएसटी कपातीमुळे 40,000 ते 50,000 रुपयांची बचत होऊ शकते.
advertisement
मेट्रो शहरांमध्ये फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठीही ही आनंदाची बातमी आहे. मोठमोठे रिअल इस्टेट प्रकल्प, ज्यांचा खर्च कोट्यवधी रुपयांमध्ये असतो, त्यातही लाखो रुपयांची बचत होईल. जर विकसकांनी (डेव्हलपर्स) ही बचत ग्राहकांपर्यंत पोहोचवली तर फ्लॅटच्या किमतीही कमी होऊ शकतात.
advertisement
एसकेए ग्रुपचे संजय शर्मा म्हणतात, जीएसटी कपातीमुळे बांधकाम खर्च कमी होईल. प्रकल्पांची गती वाढेल आणि घरे अधिक स्वस्त होतील. यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल.
advertisement
अन्सल हाउसिंगचे कुशाग्र अन्सल यांच्या मते, सिमेंट आणि टाईल्सच्या किमती कमी झाल्याने प्रकल्पांसाठी निधी मिळवणे आणि वेळेत वितरण करणे सोपे होईल. हा उद्योग आणि ग्राहक दोघांसाठीही फायदेशीर निर्णय आहे.
advertisement
लँडमार्क ग्रुपचे संदीप चिल्लर आणि प्रतीक ग्रुपचे प्रतीक तिवारी यांसारख्या तज्ज्ञांनी सांगितले की, कमी झालेल्या जीएसटीमुळे ग्राहकांना चांगल्या डील, सोप्या पेमेंट योजना आणि अधिक विश्वास मिळेल. विकसकांनी दिलेल्या माहितीनुसार- या बचतीपैकी 60% पर्यंतचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो. वेळेवर प्रकल्पांचे वितरण आणि कमी खर्च यामुळे ही सणासुदीची भेट घर खरेदीदारांसाठी खूप फायदेशीर ठरेल.
मराठी बातम्या/मनी/
नव्या GSTमुळे किती वाचणार? 20 लाखांच्या घरावर होणार इतकी बचत, 22 सप्टेंबरनंतरचे गणित असे आहे
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement