Pune Ganpati Visarjan : गणेशभक्तांसाठी धावले पुणे पोलीस, मिरवणुकीत उपचार मिळाल्याने अनर्थ टळला, 48 जण रुग्णालयात
Last Updated:
Ganesh Festival 2025 : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी आणि काही अपघातामुळे अचानक चिंता निर्माण झाली होती. मात्र पुणे पोलीस तत्परतेने धावले आणि मिरवणुकीतील प्रत्येक ठिकाणी सुरक्षा सुनिश्चित केली.
पुणे : गणेश विसर्जनाच्या गर्दीच्या दिवशी शहरातील नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य यासाठी पोलिस शिवाय विघ्नहर्ता न्यासाने मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय व्यवस्थापन केले. गर्दी, उकाडा, प्रचंड आवाज आणि तासनतास चालणाऱ्या मिरवणुकीमुळे अनेक जण लहान-मोठ्या आरोग्य समस्यांचा सामना करतात. यंदाही याच पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा केंद्र उभारण्यात आले.
एकूण 722 नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला, तर 48 जणांना तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, या सेवांमध्ये नागरिकांसोबत पोलीस बांधवांचा देखील समावेश होता. वैद्यकीय मदत घेणाऱ्यांपैकी 52 पोलीस कर्मचारी थकवा आणि उकाड्यामुळे प्रकृती बिघडल्यामुळे उपचार घेण्यासाठी आले.
शहरातील गर्दीच्या मुख्य ठिकाणांवर, जसे की बेलबाग चौक, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, लक्ष्मी रोड (गोखले हॉल), एस. पी. कॉलेज चौक आणि पूरम चौक येथे 24 तास वैद्यकीय मदत उपलब्ध होती. विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त प्रा. डॉ. मिलिंद भोई यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे नेतृत्व डॉ. शंतनू जगदाळे आणि डॉ. नंदकिशोर बोरसे यांनी केले. जवळपास 124 डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, स्वयंसेवक, आपत्कालीन उपचार तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका चालकांनी नागरिकांना तातडीची आणि जलद मदत मिळवून दिली.
advertisement
वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये मुख्य आरोग्य तक्रारी उष्णतेमुळे घाम येणे, डीहायड्रेशन, चक्कर येणे, उच्च रक्तदाब, कानदुखी, चिडचिड, दम, खोकला, गुदमरणे, दुखापती आणि बहिरेपणा यांसारख्या समस्या होत्या. विशेषतहा रंगीत धूर, भस्म, ढोलताशा आणि डीजेच्या आवाजामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक जास्त प्रभावित झाले. ट्रॅक्टरच्या चाकाखाली आलेल्या अपघात, चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जखमा आणि डीजे स्पीकर्सजवळ थिरकणाऱ्यांना बहिरेपणाच्या लक्षणांचे प्रकरणेही नोंदवली गेली.
advertisement
मोठा अनर्थ टळला असा प्रकार लक्ष्मी रोडवर घडला, जिथे ट्रॅक्टर चालकाला अचानक फिट्स आल्यामुळे तो वाहन चालवत असताना कोसळला. तातडीने आपत्कालीन उपचार मिळाल्यामुळे मोठा अपघात टळला. तसेच महिला पोलिस कॉन्स्टेबल चक्क येऊन पडल्या, त्यांना घटनास्थळी तातडीने मदत करून शेठ ताराचंव हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. एकूणच, या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत वैद्यकीय व्यवस्थापनामुळे नागरिकांना आणि पोलीस बांधवांना तातडीची मदत मिळाली तसेच मोठ्या प्रमाणावर अनर्थ टळला, हेच या उपक्रमाचे प्रमुख यश ठरले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 8:52 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Ganpati Visarjan : गणेशभक्तांसाठी धावले पुणे पोलीस, मिरवणुकीत उपचार मिळाल्याने अनर्थ टळला, 48 जण रुग्णालयात