टॅक्सपेअर्स लक्ष द्या, 1 किंवा 2 नाही, Income Tax च्या '8' प्रकारच्या असतात नोटिस; तुमच्या नोटीसचा अर्थ काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुमची वार्षिक कमाई करपात्र (Taxable) असल्यास ITR भरणे बंधनकारक आहे. पण ITR भरला तरी, तुम्ही उत्पन्न लपवले, कर बचतीच्या गुंतवणुकीचा पुरावा जोडला नाही, क्रेडिट कार्डवर मोठा खर्च केला किंवा तुमच्या बँक खात्यातील मोठा व्यवहार (High Value Transaction) विभागाच्या रेकॉर्डशी जुळला नाही, तर नोटीस नक्की येते.
मुंबई : नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्राप्तिकर विभागाची (Income Tax Department) नोटीस आली की, पहिल्यांदा टेन्शन येते. अनेकांना वाटते की आता काहीतरी मोठा गुन्हा झाला आहे. मात्र, प्रत्येक नोटीसचा अर्थ 'कारवाई' किंवा 'दंड' असा नसतो. अनेकदा या नोटिस केवळ तुमच्या रिटर्नमध्ये काही त्रुटी (Errors) किंवा स्पष्टीकरण (Clarification) मागण्यासाठी आलेल्या असतात.
तुमची वार्षिक कमाई करपात्र (Taxable) असल्यास ITR भरणे बंधनकारक आहे. पण ITR भरला तरी, तुम्ही उत्पन्न लपवले, कर बचतीच्या गुंतवणुकीचा पुरावा जोडला नाही, क्रेडिट कार्डवर मोठा खर्च केला किंवा तुमच्या बँक खात्यातील मोठा व्यवहार (High Value Transaction) विभागाच्या रेकॉर्डशी जुळला नाही, तर नोटीस नक्की येते.
पण तुम्हाला कोणत्या कलमाखाली (Section) नोटीस आली आहे, हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक कलमाखालील नोटीसचा उद्देश वेगळा असतो. येथे प्राप्तिकर विभागाच्या ८ महत्त्वाच्या नोटिसा आणि त्यांचा अर्थ दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला नेमकी कोणती कारवाई करायची आहे, हे समजेल.
advertisement
प्राप्तिकर नोटिसांचे 8 महत्त्वाचे प्रकार आणि त्यांचा अर्थ
1. कलम 139(9) नोटीस
ही नोटीस तेव्हा येते, जेव्हा तुमच्या दाखल केलेल्या ITR मध्ये कोणतीही चूक (Mistake) किंवा त्रुटी (Deficiency) आढळते. याला 'दोषपूर्ण रिटर्न' (Defective Return) म्हटले जाते. उदा. तुम्ही चुकीचा फॉर्म वापरला असेल किंवा आवश्यक कागदपत्रे जोडली नसतील. विभाग तुम्हाला ही त्रुटी सुधारण्यासाठी वेळ देतो.
advertisement
2. कलम 133(6) नोटीस (Section 133(6) Notice)
ही नोटीस केवळ माहिती मागवण्यासाठी दिली जाते. जेव्हा तुमची कमाई मूळ सूट मर्यादेपेक्षा (Basic Exemption Limit) जास्त असते, पण तुम्ही ITR भरलेला नसतो किंवा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त दाखवला जातो, तेव्हा ही नोटीस येते.
विभाग तुमच्याकडून विशिष्ट आर्थिक व्यवहाराबद्दल अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण मागतो. ही तपासणीची नोटीस नसते.
advertisement
3. कलम 142(1) नोटीस
ITR मध्ये केलेल्या दाव्यांना (Claims) पाठिंबा देण्यासाठी विभागाला अधिक तपशील (Additional Information) किंवा कागदपत्रे हवी असल्यास ही नोटीस पाठवली जाते. ITR फाईल न करणाऱ्या व्यक्तीलाही ही नोटीस येऊ शकते.
तुम्ही जे दाखवले आहे, त्यासाठी पुरावा सादर करा किंवा तुम्ही ITR का भरला नाही, याचे स्पष्टीकरण द्या.
4. कलम 143(1) नोटीस (Section 143(1) Notice)
हा एक प्रकारे ITR स्वीकारल्याचा संदेश असतो. तुमचा ITR केंद्रीय प्रक्रिया केंद्र (CPC) द्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रोसेस झाल्यानंतर ही नोटीस पाठवली जाते. याला 'सारांश मूल्यांकन' (Summary Assessment) देखील म्हणतात.
advertisement
यातून कळते की, तुमच्या उत्पन्नाची गणना आणि विभागाने केलेली गणना जुळते. यात कोणताही दंड नसतो. मात्र, काही वेळा यात कर, व्याज किंवा परतावा (Refund) यातील बदलांची माहिती दिलेली असते.
5. कलम 143(2) नोटीस
जेव्हा विभागाने तुमचा ITR अधिक सखोल तपासासाठी (Detailed Scrutiny) निवडला जातो, तेव्हा ही नोटीस येते. ही नोटीस कलम 143(1) नंतर पाठवली जाते.
advertisement
विभागाला तुमच्या रिटर्नवर काही शंका आहेत. तुमची उत्तरे किंवा स्पष्टीकरण समाधानकारक न वाटल्यास, विभाग तुमच्याकडून सर्व आर्थिक तपशील (Financial Details) मागवतो.
6. कलम 148 नोटीस
ही सर्वात गंभीर नोटिसांपैकी एक आहे. जेव्हा प्राप्तिकर विभागाला असे वाटते की, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा काही भाग लपवला (Concealed Income) आहे किंवा उत्पन्नासंबंधी कोणतीही चुकीची माहिती दिली आहे, तेव्हा ही नोटीस पाठवली जाते.
advertisement
विभाग तुमचा जुना रिटर्न पुन्हा उघडून त्याची तपासणी करेल. यासाठी तातडीने तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.
7. कलम 156 नोटीस
मूल्यांकन वर्ष पूर्ण झाल्यावर, तुमच्यावर कर, व्याज किंवा दंडाची रक्कम बाकी असल्यास, ही 'मागणी नोटीस' (Demand Notice) म्हणून पाठवली जाते.
तुम्ही विभागाला इतकी रक्कम देणे बाकी आहे आणि ती त्वरित भरावी लागेल.
8. कलम 245 नोटीस
जेव्हा तुमचा एका वर्षाचा कर परतावा बाकी असतो, पण त्याच वेळी दुसऱ्या वर्षाचा कर भरणा थकलेला (Pending) असतो, तेव्हा ही नोटीस येते.
विभाग तुमचा देय असलेला परतावा, तुमच्या थकीत करात (Pending Tax) समायोजित (Adjust) करतो. ही माहिती देण्यासाठी नोटीस पाठवली जाते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 7:12 PM IST
मराठी बातम्या/मनी/
टॅक्सपेअर्स लक्ष द्या, 1 किंवा 2 नाही, Income Tax च्या '8' प्रकारच्या असतात नोटिस; तुमच्या नोटीसचा अर्थ काय?


