ट्रेन सुटण्याच्या किती वेळ आधी तिकीट बुक करता येतं? जाणून घ्या नियम
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
किती दिवस आधी तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करू शकता, हे तुम्हाला माहीत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
नवी दिल्ली: पूर्वी रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर जावं लागे किंवा एखाद्या एजंटला पैसे देऊन तिकीटाची व्यवस्था करावी लागत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता. पण, प्रवासाला सुरुवात करण्याच्या किती दिवस आधी तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? नियमांची माहिती असलेले प्रवासी प्रवासाच्या काही दिवस आधीच तिकीट बुक करतात आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या अडचणींपासून स्वत:ला वाचवतात. किती दिवस आधी तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करू शकता, हे तुम्हाला माहीत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
ट्रेनमधील प्रत्येक श्रेणीच्या बोगीसाठी तिकीट बुक करण्यासाठी सुविधा, भाडं आणि नियम वेगळे आहेत. प्रत्येक रेल्वे प्रवाश्याला या नियमांची माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 120 दिवस आधीही तिकीट बुक करू शकता.
तिकीट बुकिंगचे नियम
भारतीय रेल्वे 120 दिवस म्हणजे चार महिने आधी तिकीट बुक करण्याची सुविधा प्रदान करते. जेणेकरून प्रवाश्यांना सहजपणे कन्फर्म सीट मिळू शकेल आणि तिकीट बुक केल्यानंतर निश्चिंत राहता येईल. तुम्ही प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधीही 'तत्काळ' सुविधेचा वापर करून ट्रेनची तिकिटं बुक करू शकता. म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याला तातडीने प्रवास करण्याची गरज पडली तर त्यालाही तिकीट मिळू शकेल, अशी सोय रेल्वेने केली आहे. थर्ड एसी आणि त्यावरील श्रेणींसाठी बुकिंग दररोज सकाळी 10 वाजता सुरू होतं. स्लीपर तत्काळ तिकीट बुकिंग सुविधा सकाळी 11 वाजता सुरू होते. युटीएस अॅपद्वारे प्रवासी प्रवासाच्या दिवशी अनारक्षित रेल्वे तिकीट बुक करू शकतात.
advertisement
जनरल तिकिटांसाठी वेगळे नियम
view commentsजनरल तिकीट खरेदी करताना दोन नियम आहेत. जर तुम्हाला एखाद्या ट्रेनच्या जनरल डब्यात 199 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करायचा असेल तर तुम्हाला त्याचदिवशी तिकीट खरेदी करावं लागेल. कारण, 199 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी घेतलेलं जनरल तिकीट केवळ तीन तासांसाठी वैध असतं. जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर तीन तासांच्या आत ट्रेन पकडावी लागते. 200 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरासाठी तीन दिवस अगोदर जनरल तिकीट खरेदी करता येतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 29, 2024 3:20 PM IST


