जिल्ह्यानुसार टेबलला नंबर, बसण्याची व्यवस्थाही यूनिक, कोकणातील फूड गॅरेज हॉटेलची सर्वत्र चर्चा, VIDEO

Last Updated:

food garage hotel in konkan : कोकणातील हे पहिले अनोख फूड गॅरेज हॉटेल आहे. नेमकी यामागची काय संकल्पना आहे, याचबाबत लोकल18 चा स्पेशल रिपोर्ट.

+
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग फूड गॅरेज हॉटेल

सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग - सध्या विविध प्रकारची आकर्षक असे हॉटेल पाहायला मिळतात. त्यातच आता सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात एक अनोखे हॉटेल सध्या चर्चेत आहे. कोकणातील हे पहिले अनोख फूड गॅरेज हॉटेल आहे. नेमकी यामागची काय संकल्पना आहे, याचबाबत लोकल18 चा स्पेशल रिपोर्ट.
ज्ञानदेव गुरव यांनी वयाच्या 58 व्या वर्षी एक वेगळी शक्कल लढवली आणि ते हॉटेल व्यवसायात उतरले आहेत. त्यांच्या मुलाच्या संकल्पनेतुन त्यांनी NH66 फूड गॅरेज या नावाने अनोखे हॉटेल सुरू केले आहे. या हॉटेलचे खास आकर्षण म्हणजे चक्क वाहनात बसून जेवणाची सोय या ठिकाणी पाहायला मिळते.
advertisement
या हॉटेलचे काऊंटरही गाडीच्या केबिनपासून बनवले आहेत. येथे प्रत्येक जेवणाचे टेबल हे वेगवेगळ्या गाड्यांपासून बनवून त्यावर बसण्याची सोय करण्यात आली आहेत. यासोबतच प्रत्येक जिल्ह्याचे नंबर याठिकाणी टेबलला देण्यात आले आहेत.
येथे पर्यटक हे आपल्या जिल्ह्यातील पासिंगच्या टेबलवर जेवणाचा आनंद घेतात. या फूड गॅरेजमधील मेन्यूचे नावही गाड्यांच्याच पार्टचे देण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात या आगळ्यावेगळ्या हॉटेलची चर्चा आहे. या हॉटेलला खास गॅरेजचे लुक असल्याने पर्यटकही खास या हॉटेलला भेट देतात.
advertisement
कोरोनानंतर रोजगार हिरवल्याने या ज्ञानदेव गुरव यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा संकल्प केला व हॉटेल हे वेगळे असावे, या उद्देशाने त्यांनी भंगारातील गाड्या खरेदी करून घरीच स्वतः मुलगा व आपण त्यांनी गाड्या पासून टेबलची निर्मिती केली.
advertisement
स्वतःच वेगळी शक्कल लढवत त्यांनी गॅरेजच्या रुपात हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली. या हॉटेलमध्ये गेल्यावर गॅरेजमध्ये जेवल्याचा एक वेगळा आनंद पाहायला मिळतो. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत लोकांना या हॉटेलमध्ये जेवणाचा मोह आवरता येत नाही. या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहेत.
मराठी बातम्या/मनी/
जिल्ह्यानुसार टेबलला नंबर, बसण्याची व्यवस्थाही यूनिक, कोकणातील फूड गॅरेज हॉटेलची सर्वत्र चर्चा, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement