advertisement

Ladki Bahin Yojana: सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांचे अर्ज बाद होणार?

Last Updated:

Ladki Bahin Yojana: सोलापूर जिल्ह्यात सुमारे साडेदहा लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु यंदा यादीतील अनेक नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.

Money
Money
मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील डिसेंबर महिन्याचा हप्ता बुधवारीलाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत उर्वरित लाभार्थींना पैसे मिळतील, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, ज्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा नवीन लाभार्थींसाठी योजनेची नोंदणी सध्या बंद करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की शासनाकडून आदेश मिळाल्यानंतरच नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल. सोलापूर जिल्ह्यात सुमारे साडेदहा लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु यंदा यादीतील अनेक नावे वगळली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संजय गांधी निराधार योजनांशी लिंक केलेले लाभार्थी वगळले जाणार
advertisement
राज्य शासनाने योजनेत दुबार लाभ घेणाऱ्या लाभार्थींना ओळखून यादीतून त्यांची नावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाईल. शासनाकडे या योजनांची अद्ययावत यादी असल्याने, डिसेंबरचा हप्ता संबंधित महिलांच्या खात्यात जमा होणार नाही.
नवीन नोंदणीबाबत महिलांच्या मागण्या
दरम्यान, अनेक महिलांनी योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडे नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे, मात्र शासनाच्या आदेशाशिवाय पुढील प्रक्रिया होणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
योजनेतील पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्न
राज्य शासनाने योजनेंतर्गत लाभार्थींच्या यादीतील दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे योजना अधिक पारदर्शक होईल आणि गरजू महिलांपर्यंत तिचा लाभ पोहोचेल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजना सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. मात्र, नवीन नोंदणी थांबवल्यामुळे काही महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. शासनाकडून पुढील आदेश मिळाल्यानंतरच प्रक्रिया पुढे जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana: सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांचे अर्ज बाद होणार?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement