8 मिनिटांत लुटले 900 कोटी, Weak पासवर्ड ठरला घातक, फिल्मी चोरीचं रहस्य अखेर समोर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जगातील सर्वात प्रसिद्ध लूव्र म्युझियम (Louvre Museum) अलीकडे अशाच एका थरारक चोरीमुळे चर्चेत आलं आहे.
मुंबई : कला आणि इतिहासाच्या चाहत्यांसाठी संग्रहालय म्हणजे ज्ञानाचं आणि सौंदर्याचं खजिनाच असतो. पण कधी कधी अशाच ठिकाणी चोरी होते. अभिनेता रितिक रोशनचा धूम 2 सिनेमा तुम्हाला आठवतच असेल, त्यामध्ये रुप घेऊन रितिकने कशी चोरी केली तुम्ही पाहिलंच असेल. हा सिनेमा खूपच थ्रीलिंग होता. तो पाहून अनेकांना वाटलं की हे फक्त सिनेमात शक्य आहे. खऱ्या आयुष्यात हे शक्य नाही. पण असं नाही. हल्लीच एक अशी चोरी झाली आहे जी सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही.
जगातील सर्वात प्रसिद्ध लूव्र म्युझियम (Louvre Museum) अलीकडे अशाच एका थरारक चोरीमुळे चर्चेत आलं आहे.
19 ऑक्टोबर रोजी फ्रान्सच्या पॅरिस शहरातील या जागतिक दर्जाच्या म्युझियममध्ये दिवसाढवळ्या चोरी झाली. या चोरीत तब्बल 8.8 कोटी युरो (सुमारे 900 कोटी रुपये) किमतीचे दागिने गायब झाले. चौघा चोरट्यांनी केवळ 8 मिनिटांत ही संपूर्ण कारवाई पूर्ण केली. पण या घटनेनंतर एक मोठा प्रश्न समोर आला इतक्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी इतकी मोठी सुरक्षा त्रुटी कशी राहिली?
advertisement
अनेक वर्षांपासून सुरक्षा प्रणालीत त्रुटी
फ्रेंच वृत्तपत्र Libération च्या अहवालानुसार, लूव्र म्युझियममध्ये सायबर सिक्युरिटी आणि देखभाल (Maintenance) या दोन्ही विभागांमध्ये दशकांपासून त्रुटी आहेत. या समस्या अनेक वेळा समोर आल्या होत्या, मात्र त्यावर कधीही पूर्णपणे उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
डिसेंबर 2014 मध्ये फ्रान्सच्या National Cybersecurity Agency (Anssi) ने म्युझियमच्या IT आणि सुरक्षा नेटवर्कचं ऑडिट केलं होतं. त्या वेळीच अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या.
advertisement
ऑडिट रिपोर्टनुसार, म्युझियमच्या सुरक्षा नेटवर्कमध्ये कमकुवत पासवर्ड आणि जुनी सिस्टम्स वापरल्या जात होत्या. एवढंच नव्हे, तर काही ठिकाणी फक्त ‘LOUVRE’ लिहिल्यावर व्हिडिओ सर्व्हिलन्स सर्व्हरचा ऍक्सेस मिळत होता!
तसंच, ‘THALES’ लिहिल्यावर थाल्स ग्रुपने तयार केलेला दुसरा सॉफ्टवेअर उघडत होता. या त्रुटीमुळे हॅकर्स सहजपणे म्युझियमच्या इंटरनल सिस्टीममध्ये प्रवेश करू शकत होते, तसेच व्हिडिओ फीड बदलणं किंवा ऍक्सेस बॅज हॅक करणं शक्य होतं.
advertisement
2014 च्या अहवालानंतरही Anssi एजन्सीने म्युझियमला पासवर्ड मजबूत करण्याची आणि सिस्टीम अपग्रेड करण्याची सूचना दिली होती. पण लूव्र म्युझियमने यापैकी किती सूचना अमलात आणल्या, हे त्यांनी कधीही सार्वजनिकरित्या जाहीर केले नाही.
2017 मध्ये झालेल्या आणखी एका ऑडिटमध्येही अशाच समस्या पुन्हा सापडल्या.
फक्त 8 मिनिटांत 900 कोटींची चोरी
19 ऑक्टोबरच्या दिवशी चार चोरट्यांनी बास्केट लिफ्टच्या मदतीने भिंत चढली, खिडकी फोडली आणि डिस्प्ले केस तोडून दागिने पळवले. संपूर्ण कारवाई अवघ्या 8 मिनिटांत पूर्ण झाली. ही घटना इतकी फिल्मी होती की सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही काही वेळ समजलं नाही की नेमकं काय घडलं आहे.
advertisement
या प्रकरणात आता पोलिस तपास सुरू असून काही व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मात्र या चोरीने लूव्र म्युझियमच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि सायबर संरक्षणावर मोठे प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 5:44 PM IST


