12 वीची परीक्षा देऊन सुरू केला व्यवसाय, तरूण विकतोय गोळ्याचे 20 प्रकार, महिन्याला 70 हजार कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नाशिकच्या एका तरुणाने यंदाचं 12 वीची परीक्षा देऊन काही तरी स्वतःचा व्यवसाय असावा या करता गोळा फेस्टिव्हल ही नवीन कल्पना सुरू केली आहे. ज्या ठिकाणी तुम्ही विविध फ्लेवर्सच्या गोळ्यांचा तसेच सरबत आणि आईस्क्रिमचा आनंद घेऊ शकणार आहेत.
नाशिक : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि त्यातच रसवंती तसेच गोळ्याचे दुकाने हे आपल्याला जागोजागी दिसत आहेत. अश्यातच नाशिकच्या एका तरुणाने यंदाचं 12 वीची परीक्षा देऊन काही तरी स्वतःचा व्यवसाय असावा या करता गोळा फेस्टिव्हल ही नवीन कल्पना सुरू केली आहे. ज्या ठिकाणी तुम्ही विविध फ्लेवर्सच्या गोळ्यांचा तसेच सरबत आणि आईस्क्रिमचा आनंद घेऊ शकणार आहेत.
नाशिकच्या शुभम गामाने या तरुणाने यंदाचं 12 वीची परीक्षा दिली आहे. परंतु 12 वीचा निकाल लागेपर्यंत आपण काही तरी व्यवसाय करावा जेणेकरून आपल्याला आपला स्वतःचा खर्च भागवता येईल या विचाराने नाशिक येथील मखमलाबाद परिसरातील गामाने माळा या ठिकाणी मोठा गोळा फेस्टिव्हल आयोजित केला आहे. शुभम हा गेल्या 2 वर्षापासून म्हणजेच 10 वी पासून असा काही ना काही सिझन नुसार व्यवसाय करत असल्याचे त्याने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
कशी आली गोळा फेस्टिव्हलची कल्पना?
शुभम हा कॉलेजला असताना सहज मित्रांसोबत एके वेळेस गोळा खाण्यासाठी एका हातगाडीवर गेला असताना त्या ठिकाणी त्याने गोळा बनत असताना निरीक्षण केले. त्यानंतर मित्रांमध्ये व्यावहारिक दृष्टीने त्याने सहज आपण देखील हा व्यवसाय करू शकतो याला भांडवल नाही असे सांगितल्याने. मित्रांना देखील ही कल्पना आवडली नंतर त्याने घरात देखील ही कल्पना मांडल्यानंतर वडिलांनी आणि आईने देखील त्याला होकार दिला.
advertisement
शुभम याने त्याचा हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नवीन असताना त्याला बर्फ घेताना किंवा गोळा विकताना अडचणी येत गेल्या असल्याचे तो सांगत असतो. अंदाज नसताना आपण बर्फ आणतो परंतु तो बर्फ गोळा विकल्या गेला नाही तर आपल्याच अंगावर पडत असतो. याची कल्पना त्याला आल्याने त्याने सर्व नियोजन लावत पुढे वाटचाल केली.
advertisement
त्यानंतर आपण लोकांना बसण्यासाठी जागा देऊ जेणेकरून लोक त्या ठिकाणी आनंदाने गोळा खातील आणि आपला व्यवसाय देखील या माध्यमातून वाढेल या करता त्याने मग गोळा फेस्टिव्हलचे आयोजन केले. आज त्याला या व्यवसायात महिन्याला 70 हजाराचे उत्पन्न हे मिळत असते. कमी वयातच व्यवसायाचा अनुभव आल्याने शुभम याचा आत्मविश्वास हा वाढला आहे. आपण पुढे जाऊन व्यवसायच करावा अशी त्याची इच्छा त्याने लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
advertisement
काय आहे गोळा फेस्टिव्हलमध्ये?
शुभम याने घरीच आईच्या मदतीने तब्बल 20 पेक्षा अधिक वेगवेगळे फ्लेवर्स बनविले आहेत. तसेच याचाकडे साधा गोळा, गोळा डिश, रबडी गोळा असे अनेक प्रकारचे फ्लेवर गोळे हे खायला मिळणार आहेत. तसेच याचे सर्वात प्रसिद्ध म्हणजे आईस्क्रीम गोळा डिश. ज्यात तुम्हाला आईस्क्रीम सोबत गोळ्याचा आनंद मिळणार आहे. तसेच याचाकडे फक्त 20 रुपयांपासून ते पुढे 200 रुपयांपर्यंत अनेक वेगवेगळे गोळे हे खाण्यासाठी उपलब्ध आहे.
advertisement
कुठे आहे याचे हे दुकान?
नाशिकमधील मखमलाबाद गावाजवळी गामाने मळा या परिसरात गोळा द नाशिक गोळा फेस्ट या नावाने तुम्हाला स्टॉल दिसणार आहे. तुम्ही देखील उन्हाळ्यात काहीतरी नवीन थंड खाण्याच्या इच्छेत असणार तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य असणार आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
April 09, 2025 9:35 PM IST
मराठी बातम्या/मनी/
12 वीची परीक्षा देऊन सुरू केला व्यवसाय, तरूण विकतोय गोळ्याचे 20 प्रकार, महिन्याला 70 हजार कमाई