Share Markeमध्ये होणार मोठी उलथापालथ,16 शेअर्सची यादी फुटली; गुंतवणूकदारांची वाढली धडधड

Last Updated:

Share Market Prediction: पुढील आठवडा शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. Infosys, L&T Tech, REC आणि Tanla Platforms सारख्या दिग्गज कंपन्या डिव्हिडंड जाहीर करणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता आणि सस्पेन्स निर्माण झाला आहे.

News18
News18
मुंबई: आगामी आठवड्यात म्हणजे सोमवार 27 ऑक्टोबर 2025 पासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी येणार आहे. अनेक दिग्गज कंपन्या आपल्या शेअरधारकांना डिव्हिडंड (लाभांश) देण्याची घोषणा करणार आहेत. यामध्ये इन्फोसिस (Infosys), टॅनला प्लॅटफॉर्म्स (Tanla Platforms), एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (L&T Tech), आरईसी लिमिटेड (REC), कोफोर्ज (Coforge) आणि इतर अनेक प्रसिद्ध कंपन्या सामील आहेत. या सर्व कंपन्यांचे शेअर्स 27 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान एक्स-डिव्हिडंड (Ex-Dividend) वर ट्रेड होतील.
advertisement
एक्स-डिव्हिडंड ट्रेड म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर एक्स-डिव्हिडंड डेट पासून ट्रेड होऊ लागतो, तेव्हा त्या तारखेपासून त्या शेअरमध्ये पुढील लाभांशाची किंमत (value) समाविष्ट नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर एक्स-डिव्हिडंड तारखेच्या नंतर जर तुम्ही शेअर खरेदी केला, तर तुम्हाला त्या कंपनीचा पुढील लाभांश मिळणार नाही.लाभांश फक्त त्या गुंतवणूकदारांना मिळेल ज्यांच्या डिमॅट खात्यात त्या शेअरचा मालकी हक्क रेकॉर्ड डेटच्या किमान 2 तास आधीपर्यंत आहे.
advertisement
कंपनीचे नावप्रकारलाभांश (₹ प्रति शेअर)
360 ONE WAM Ltdअंतरिम डिव्हिडंड₹6
Central Bank of Indiaअंतरिम डिव्हिडंड₹0.20
CESC Ltdअंतरिम डिव्हिडंड₹6
CRISIL Ltdअंतरिम डिव्हिडंड₹16
Infosys Ltdअंतरिम डिव्हिडंड₹23
L&T Technology Services Ltdअंतरिम डिव्हिडंड₹18
PCBL Chemical Ltdअंतरिम डिव्हिडंड₹6
REC Ltdअंतरिम डिव्हिडंड₹4.60
Tanla Platforms Ltdअंतरिम डिव्हिडंड₹6
advertisement
कंपनीचे नावप्रकारलाभांश (₹ प्रति शेअर)
Coforge Ltdअंतरिम डिव्हिडंड₹4
Jasch Gauging Technologies Ltdअंतरिम डिव्हिडंड
Julien Agro Infratech Ltdअंतरिम डिव्हिडंड₹0.01
Laurus Labs Ltdअंतरिम डिव्हिडंड₹0.80
NRB Bearings Ltdअंतरिम डिव्हिडंड₹2.50
PDS Ltdअंतरिम डिव्हिडंड
Supreme Petrochem Ltdअंतरिम डिव्हिडंड₹2.50
advertisement
बीएसईच्या (BSE) माहितीनुसार पुढील आठवड्यात काही कंपन्या स्टॉक स्प्लिट (Stock Split) आणि इतर कॉर्पोरेट अॅक्शन देखील करणार आहेत.
पुढील आठवड्यातील एक्स-स्टॉक स्प्लिट (Stock Split)
KSE Ltd ही कंपनी आपले शेअरचे फेस व्हॅल्यू 10 वरून 1 करीत आहे. याचा अर्थ असा की, एका जुन्या शेअरच्या बदल्यात गुंतवणूकदारांना 10नवे शेअर्स मिळतील. म्हणजेच तुमच्याकडे शेअर्सची संख्या वाढेल, पण एकूण गुंतवणुकीची किंमत बदलणार नाही. स्टॉक स्प्लिटचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेअरची लिक्विडिटी वाढवणे, ज्यामुळे त्याची खरेदी-विक्री सोपी होते.
advertisement
कंपनीचे नावप्रकारतारीख
Dhani Services Ltdशेअर एमालगमेशन (विलिनीकरण)मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५
Indiabulls Enterprises Ltdशेअर एमालगमेशन (विलिनीकरण)मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५
Dalmia Bharat Sugar and Industries Ltdस्पिन-ऑफ शेअर्स (नव्या कंपनीत विभागणी)शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५
Mangalore Chemicals & Fertilizers Ltdएमालगमेशन (विलिनीकरण)शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५
Modern Insulators Ltdस्पिन-ऑफ शेअर्सशुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
Share Markeमध्ये होणार मोठी उलथापालथ,16 शेअर्सची यादी फुटली; गुंतवणूकदारांची वाढली धडधड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement