advertisement

पीएम आवासमध्ये मिळालेली सब्सिडी सरकार घेईल परत, करु नका 'या' चुका

Last Updated:

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY), PMAY 2.0 ची नवीन आवृत्ती 9 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च करण्यात आली आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) लोकांना घरे खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी सहाय्य प्रदान करते.

प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना
नवी दिल्ली : सरकारने 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) दुसरा टप्पा सुरू केला. PMAY 2.0 ही क्रेडिट-लिंक्ड सबसिडी योजना (CLSS) आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) लोकांना घरे खरेदी किंवा बांधण्यात मदत पुरवणे हा त्याचा उद्देश आहे. परंतु या योजनेंतर्गत काही अटींवर सबसिडीही परतही घेतली जाऊ शकते. ज्याबद्दल बहुतांश लाभार्थ्यांना माहिती नसते.
सरकारने PMAY 2.0 अंतर्गत अनेक पात्रता अटी ठेवल्या आहेत, ज्यांच्या अंतर्गत कोठेही कायमस्वरूपी घर नसलेल्या लोकांनाच लाभ मिळेल. उत्पन्नावर आधारित वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.
EWS: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
LIG: वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान असावे.
MIG: वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 9 लाख रुपये दरम्यान असावे.
advertisement
सबसिडी काढून घेण्याची कारणं
योजनेंतर्गत दिलेले व्याज अनुदान काही विशिष्ट परिस्थितीत काढता येते. त्याच्या मुख्य कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- कर्जदार कर्जाची परतफेड करू शकत नसल्यास आणि त्याचे खाते NPA (नॉन परफॉर्मिंग ॲसेट) बनते.
- अनुदान जारी झाल्यानंतर घराचे बांधकाम काही कारणाने रखडल्यास.
advertisement
- एक वर्षाच्या आत वापराचे प्रमाणपत्र सादर न केल्यास.
PMAY सबसिडी कशी काम करते?
PMAY योजनेअंतर्गत, कर्जदाराच्या लोन अकाउंटमध्ये व्याज अनुदान आधीच जोडले गेले आहे, ज्यामुळे त्यांचा EMI कमी होतो. EWS आणि LIG श्रेणींना 6.5% व्याज अनुदान मिळते.
advertisement
EMI वर परिणाम
सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराचा ईएमआय वाढू शकतो. अनुज शर्मा, COO, IMGC यांच्या मते, PMAY सबसिडी कर्जदाराचा प्रभावी व्याजदर कमी करते. सबसिडी संपल्यावर, त्यांना मूळ व्याजदरावर परत यावे लागते, ज्यामुळे ईएमआय वाढतो.
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
कोणत्या परिस्थितीत सबसिडी काढता येईल याची माहिती लाभार्थ्यांनी त्यांच्या बँकेतून घ्यावी. याशिवाय वापराचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणेही महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
पीएम आवासमध्ये मिळालेली सब्सिडी सरकार घेईल परत, करु नका 'या' चुका
Next Article
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
  • इराणचा सर्वात मोठा इशारा!

  • एका सेकंदात संपूर्ण जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार?

  • जगाची डिजिटल लाइफलाईन कापून टाकणारा

View All
advertisement