Richest Country : ना स्वत:चं विमानतळ, ना चलन… पण संपत्ती मात्र जगात अव्वल; हा देश आहे लिस्टमध्ये Top

Last Updated:

प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतो. भारतासारख्या देशात तर रुपयाला डॉलरच्या बरोबरीने आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : या जगात जगण्यासाठी अन्न, घर, कपडे या सगळ्यांइतकंच महत्त्वाचं आहे 'पैसा'. आपण काम करतो, धडपडतो आणि दिवस-रात्र मेहनत घेतो. फक्त एकाच गोष्टीसाठी ते म्हणजे आर्थिक स्थैर्थ. कुणी नोकरीतून तर कुणी व्यवसायातून पैसा कमावतो. प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतो. भारतासारख्या देशात तर रुपयाला डॉलरच्या बरोबरीने आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
लोकांपासून सरकारपर्यंत प्रत्येकजण आपल्या देशाची आर्थिक प्रगती वाढवण्यासाठी झटतोय. पण याच जगात एक देश असा आहे. जो ना या स्पर्धेत सहभागी आहे, ना त्याच्याकडे स्वतःची चलन व्यवस्था आहे. तरीही तो देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा कोणता देश आहे, जो जगात श्रीमंत देखील आहे आणि त्याची स्वत:ची मुद्रा आहे.
advertisement
हा देश आहे लिकटेंस्टाईन (Liechtenstein). जगातील छोटा पण सर्वात श्रीमंत देश
लिकटेंस्टाईन हा क्षेत्रफळानुसार जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. या देशाचं एकूण क्षेत्रफळ फक्त 160.5 चौरस किलोमीटर इतकं आहे. म्हणजेच मुंबईपेक्षा थोडं मोठं (152 चौरस किमी) आणि पिंपरी-चिंचवड (180-200 चौरस किमी) शहरापेक्षा लहान, असं आहे.
advertisement
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या छोट्या देशाकडे स्वतःचं चलन किंवा विमानतळही नाही. तरीही हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत अगदी वरच्या स्थानावर आहे.
लिकटेंस्टाईन स्वतःचं चलन न वापरता स्वित्झर्लंडचं स्विस फ्रँक (Swiss Franc) हे चलन वापरतो. विमान प्रवासासाठीही या देशात स्वतःचा एअरपोर्ट नसल्याने लोकांना ऑस्ट्रिया किंवा स्वित्झर्लंडमधून प्रवास करावा लागतो.
advertisement
लोकसंख्या कमी, जीवनमान उच्च
या देशाची लोकसंख्या अवघी सुमारे 40,000 आहे, पण जीवनमान इतकं उच्च आहे की लिकटेंस्टाईन मानव विकास निर्देशांकात (HDI) जगात 17 व्या स्थानावर आहे.
GDP मध्ये नंबर वन
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्न (Per Capita GDP) या बाबतीत लिकटेंस्टाईन जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका या यादीत 8 व्या आणि भारत 147 व्या स्थानावर आहे. म्हणजेच, छोट्या आकाराचा पण मोठ्या संपत्तीचा हा देश जगाला शिकवतो 'श्रीमंती आकाराने नाही, तर विचारांनी आणि व्यवस्थेने ठरते.'
advertisement
कदाचित एकदा या देशाला भेट द्यायला हवी, पैशाच्या नव्हे, तर व्यवस्थेच्या श्रीमंतीचं रहस्य समजून घेण्यासाठी.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Richest Country : ना स्वत:चं विमानतळ, ना चलन… पण संपत्ती मात्र जगात अव्वल; हा देश आहे लिस्टमध्ये Top
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement