Success Story : शेफचे काम सोडले, उभारला अनोखा कॅफे, तरुणाची महिन्याला इतकी कमाई

Last Updated:

काम करत असताना त्यांना जाणवले की स्वतःच्या स्किल्स आणि अनुभवाचा उपयोग उद्योजकतेसाठी करावा.

+
बदलापूरच्या

बदलापूरच्या रोहन कदम यांचा ‘वेजिफाय’ कॅफे – १३ वर्षांच्या अनुभवातून साकारलेले यशस्वी स्वप्न

ठाणे : बदलापूरच्या रोहन कदम यांनी 13 वर्षांच्या खाद्यजगतातील अनुभवाच्या बळावर वेजिफाय नावाचा अनोखा प्युअर व्हेज कॅफे सुरू करून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. रोहन यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील एका प्रसिद्ध फूड इंग्रिडिएंट्स कंपनीमध्ये शेफ म्हणून कारकीर्द सुरू केली. काम करत असताना त्यांना जाणवले की स्वतःच्या स्किल्स आणि अनुभवाचा उपयोग उद्योजकतेसाठी करावा.
आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी मेंटर्स, सीनियर शेफ्स आणि तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यांच्या प्रेरणेतून वेजिफाय हा अनोखा कॅफे उभारला गेला. वेजिफायचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे शाकाहारी (प्युअर व्हेज) कॅफे असून, स्वादिष्ट पदार्थ इथे मिळतात. काही डिशेसची चव नॉन-व्हेज पदार्थांसारखी वाटते.  खिमा पाव सारखे लोकप्रिय पदार्थ येथे वेज स्वरूपात तयार केले जातात जे ग्राहकांना नवा आणि चविष्ट अनुभव देतात.
advertisement
रोहन सांगतात, बिझनेस म्हटला की अडचणी येणारच, पण त्या सामोरं जाणं आणि त्यातून बाहेर पडणं हेच खरं यश आहे. या प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबाचा, मित्रांचा तसेच मेंटर्स आणि सीनियर शेफ्सचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यांचे मेंटर आणि बिझनेस पार्टनर  जगदीशजी हे मुंबईतील अनुभवी उद्योजक असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच वेजिफायचे स्वप्न वास्तवात उतरले. या व्यवसायातून ते महिन्याला 70 कमाई करतात.
advertisement
सध्या मुलुंड आणि बदलापूर हे दोन आउटलेट्स यशस्वीपणे चालवत असलेले रोहन लवकरच वेजिफायच्या शाखा वाढवून 4-8 पर्यंत नेण्याचा मानस व्यक्त करतात. तरुण उद्योजकांना संदेश देताना ते म्हणतात, बिझनेस करायचा असेल तर धीर आणि संयम आवश्यक आहे. आपली स्किल्स वापरा, नवीन आयडिया निर्माण करा आणि त्यावर सखोल रिसर्च करा. प्रयत्न करत राहिलात तर यश नक्कीच मिळेल. वेजिफाय हा फक्त कॅफे नसून, अनुभव, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून उभा राहिलेला एक प्रेरणादायी प्रवास आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : शेफचे काम सोडले, उभारला अनोखा कॅफे, तरुणाची महिन्याला इतकी कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement