Entertainment सिनेमासारखी रिअल घटना, नाशिकमध्ये कॅफेचा मालक आहे कुत्रा!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
अनेक नवनवीन संकल्पना राबवत व्यवसाय सुरू करत आहेत. नाशिकमध्ये असा एक कॅफे आहे, ज्याचा मालक चक्क एक मार्शल नावाचा कुत्रा आहे.
नाशिक : अनेक नवनवीन संकल्पना राबवत व्यवसाय सुरू करत आहेत. नाशिकमध्ये असा एक कॅफे आहे, ज्याचा मालक चक्क एक मार्शल नावाचा कुत्रा आहे. जो पूर्ण कॅफे चालवत असतो. इतकेच नाही तर लोक सुद्धा मार्शलला भेटण्यासाठी लांबून येत असतात. तर या कॅफेचा मालक मार्शल कसा बनला आणि यामागची कल्पना काय आहे, हे आज आपण लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
आजवर तुम्ही बघितलं असणार, कोणत्याही वस्तूचा किंवा गोष्टींचा चालक-मालक स्त्री अथवा पुरुष असतो. परंतु आता नाशिकमधला एक कॅफेचा मालक चक्क मार्शल नावाचा कुत्रादेखील आहे. ऐकायला थोडं हास्यास्पद आहे, परंतु हे खरं आहे. या कॅफेचे चालक तसे शुभम ढोंगे आहेत, परंतु मालक मात्र त्यांचा पाळीव कुत्रा मार्शल आहे. शुभम सांगतात, हा कॅफे मार्शलच्याच नावाने प्रसिद्ध आहे. इथे येणारे कस्टमर फक्त मार्शलसाठीच येत असतात. यामुळे मूळ मालक सुद्धा मार्शलच आहे.
advertisement
शुभमला एक व्यवसाय सुरू करायचा होता. पण कुठला करावा या विचारात मित्रमंडळी बसले असताना, मार्शल त्याच्यासमोर खेळताना दिसला आणि तिथून सुरुवात झाली या कॅफेची. ते सांगतात, बऱ्याच ठिकाणी आपल्या पाळीव प्राण्यांना नेणे बंधनकारक असते. तर आपण असा कॅफे नाशिकमध्ये सुरू करूया, ज्या ठिकाणी तुम्ही आपल्या घरातील पाळीव सदस्याला हक्काने घेऊन जाऊ शकता.
advertisement
कारण शुभम यांच्याकडेदेखील पूर्वीपासून कुत्रा असल्याने अडचणी आल्याच आहेत आणि त्याचबरोबर मुख्य कारण असे की, बऱ्याच लोकांना प्राणी पाळायला आवडत असतात. परंतु घरातील लोक त्याला होकार देत नसतात. तर या ठिकाणीदेखील ते लोक येतील आणि मार्शलसोबत खेळतील या हेतूने आपण असा कॅफे सुरू करूया अशी कल्पना त्यांना सुचली आणि कॅफे सुरू झाला.
advertisement
शुभम सांगतात, या ठिकाणी लोक फक्त मार्शलला भेटण्यासाठी येतात आणि त्यामुळेच कॅफेला चालना आणि ओळख मिळाल्यामुळे या ठिकाणाचा मालकदेखील मार्शलच असणार आहे. तर तुम्हीदेखील नक्की नाशिकमधील गंगापूर रोडवरील मार्शल कॅफे आणि त्याच्या मालकाला भेट देऊ शकता.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
October 31, 2025 4:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Entertainment सिनेमासारखी रिअल घटना, नाशिकमध्ये कॅफेचा मालक आहे कुत्रा!

 
              