शेअर आहे की जादू? 6 रुपयांचा शेअर पोहोचला थेट 94 वर; 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना बनवले करोडपती!

Last Updated:

Saffron Industries चा शेअर ६.७० रुपयांवरून ९४.४६ रुपयांवर पोहोचला, सहा महिन्यांत १३५३ टक्के रिटर्न देत गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं. प्रमोटर्सची भागीदारी ६०.५ टक्के.

News18
News18
अबब! शेअर आहे की जादू? असंच या शेअरकडे पाहून म्हणावं लागेल, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंच आहे. कंपनीचा शेअर अगदी ६ रुपयांवर होता, आज त्याची किंमत ९४ रुपये झाली आहे. ज्यांनी किमान लाखभर रुपये गुंतवले असतील ते सगळे मालामाल झाले आहेत. या शेअर कोणत्या कंपनीचा आहे आणि त्याने मागच्या पाच वर्षांत कसे आणि किती रिटर्न्स दिले पाहुयात. शेअर बाजारातील गुंतवणुकीत चमत्कार घडू शकतात, हे पुन्हा एकदा दिसलं. Saffron Industries या शेअरने गेल्या काही महिन्यात जे गुंतवणूकदारांना दिलं ते लाखमोलाचं आहे.
Saffron Industries या कंपनीच्या शेअरने गेल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवलं. सहा महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे तब्बल १४ पटींने वाढवले. हा मल्टीबॅगर स्टॉक सध्या जोरदार चर्चेत असून, या शेअरमधील तेजी अजूनही थांबलेली नाही, याचेच संकेत बाजारात दिसत आहेत.
६ रुपयांचा शेअर पोहोचला थेट ९४ रुपयांवर
या कंपनीच्या शेअरने नेमका किती रिटर्न दिला हे आकडेवारीतून स्पष्ट होते. आजपासून सहा महिन्यांपूर्वी, म्हणजे १ जानेवारी २०२५ रोजी Saffron Industries च्या शेअरची किंमत केवळ ६.७० रुपये इतकी होती. आज याच शेअरचा भाव वाढून तो थेट ९४.४६ रुपयांवर पोहोचला आहे. या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल १३५३ टक्के १४ पटहून अधिक रिटर्न दिले. ज्यांनी सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले आहेत आणि आजपर्यंत ते कायम ठेवले आहेत त्यांना आज गुंतवणुकीमुळे १४,५३,२३० रुपये मिळाले. केवळ सहा महिन्यांत एक लाखाचे १४ लाखांहून अधिक होणं, हे जादू झाल्यासारखंच आहे.
advertisement
अल्पावधीत जबरदस्त रिटर्नची आकडेवारी
Saffron Industries या कंपनीने सहा महिन्यांतच नाही, तर अगदी कमी वेळात सर्वात जास्त रिटर्न दिले आहेत. गेल्या एका महिन्यात या शेअरने १६१ टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे, तर सहा महिन्यांत तो १३५३ टक्क्यांनी वाढला आहे. एका वर्षाच्या कालावधीचा विचार केल्यास, या स्टॉकने गुंतवणूकदारांना ७७४ टक्के इतका मोठा नफा मिळवून दिला आहे. १८३४ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा मुख्य व्यवसाय सुरुवातीला पेपर आणि पेपर-उत्पादने होता. मात्र, वेळेनुसार कंपनीने आपला विस्तार रिअल इस्टेटसह अन्य व्यवसायांमध्येही केला आहे, ज्यामुळे कंपनीच्या मूल्यांकनात वाढ झाली आहे.
advertisement
गुंतवणूकदारांचा विश्वास
या कंपनीमध्ये Promoters ची भागीदारी ६०.५ टक्के आहे. तर, सामान्य गुंतवणूकदारांची भागीदारी ३९.४ टक्के आहे. म्युचुअल फंड्सची हिस्सेदारी केवळ ०.१ टक्के असून, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार FII आणि इतर गुंतवणूकदारांची हिस्सेदारी शून्य आहे. या आकडेवारीवरुन लक्षात येईल की प्रमोटर्सची भागीदारी सर्वात जास्त आहेत. तसेच सामान्य गुंतवणूकदारांचाही या स्टॉकवर विश्वास कायम आहे. गेल्या तीन महिन्यांत कंपनीतील कोणत्याही 'इन्सायडर'ने शेअर विकलेला नाही, हे कंपनीतील विश्वासाचे आणि स्थिरतेचे मोठे लक्षण आहे.
advertisement
(डिस्क्लेमर: ही माहिती केवळ शेअरच्या मागील कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी कृपया गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. आपणास होणाऱ्या कोणत्याही नफ्या तोट्यासाठी News18 Marathi जबाबदार नाही.)
view comments
मराठी बातम्या/मनी/
शेअर आहे की जादू? 6 रुपयांचा शेअर पोहोचला थेट 94 वर; 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना बनवले करोडपती!
Next Article
advertisement
ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement