Share Market Crash : शेअर बाजारात येणार सुनामी...गुंतवणूकदारांना रेड अलर्ट, अब्जावधी बुडणार, दिग्गजाने केला मोठा दावा...

Last Updated:

share Market : मागील काही दिवसांपासून चढ-उतार पाहणाऱ्याा शेअर बाजारात मोठी सुनामी येणार असून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेअर बाजारात येणार सुनामी...गुंतवणूकदारांचे अब्जावधी बुडणार, दिग्गजाने केला मोठा दावा
शेअर बाजारात येणार सुनामी...गुंतवणूकदारांचे अब्जावधी बुडणार, दिग्गजाने केला मोठा दावा
Share Market Crash: शेअर बाजारातील लाखो गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून चढ-उतार पाहणाऱ्याा शेअर बाजारात मोठी सुनामी येणार असून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एका दिग्गज व्यक्तीने वर्तवलेल्या या अंदाजामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. बाजारातील घसरणीमुळे अब्जावधींचा चुराडा होणार असल्याचेही भाकित वर्तवले आहे.
"रिच डॅड, पुअर डॅड" या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकाचे लेखक यांनी हा दावा केला आहे. शेअर बाजारात, विशेषतः अमेरिकन शेअर बाजारात, मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यांनी याला "Massive Crash'' म्हटले आहे. अमेरिकन बाजारातील या घसरणीचा जगभरातील इतर बाजारपेठांवर मोठा परिणाम होईल. विशेषतः भारतीय शेअर बाजारावर या घसरणीचा परिणाम होऊ शकतो.
advertisement
"रिच डॅड, पुअर डॅड" या पुस्तकाबाबत रॉबर्ट कियोस्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले आहे की, नजीकच्या काळात वॉल स्ट्रीटवर मोठी घसरण दिसून येऊ शकते. यामुळे गुंतवणूकदारांना लाखो डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. आताच स्वतःची गुंतवणूक सुरक्षित करण्याची तयारी सुरू करण्यास त्यांनी सांगितले. त्यांनी शेअर बाजारातील ही घसरण कशी टाळायची हे देखील स्पष्ट केले आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या धोरणांवर पुनर्विचार करण्याचे आणि त्यांचे पोर्टफोलिओ समायोजित करण्याचे आवाहन केले.
advertisement

गुंतवणूकदारांनी कुठे गुंतवणूक करावी?

रॉबर्ट यांनी स्पष्ट केले की गुंतवणूकदारांनी संभाव्य इक्विटी बाजारातील घसरणीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक शोधली पाहिजे. यासाठी गुंतवणूकदारांनी चांदी, सोने आणि क्रिप्टोकरन्सी सारख्या पर्यायांचा विचार करावा. हे गुंतवणूक पर्याय त्यांना मोठ्या नुकसानापासून वाचवू शकतात. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियम सारखे गुंतवणूक पर्याय तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतात." त्यांनी पुढे म्हटले की सोने आणि चांदी ही महागाईविरुद्ध सर्वात शक्तिशाली गुंतवणूक आहे.
advertisement

कोविडनंतरही दिला होता इशारा...

त्यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जगातील सर्वात महागडे चलन या महिन्यात ५ टक्क्यांनी घसरले आहे आणि गुंतवणूकदारांना नफा कमविण्याची चांगली संधी आहे.
सध्या, या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य प्रति क्रिप्टो १,०४,७८२ डॉलर इतके आहे.ऑक्टोबरमध्ये एकदा हा दर १,२६,००० डॉलर इतका सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत होता. या संदर्भात इथेरियमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा दिसू शकतो. रॉबर्ट यांनी यापूर्वी कोविड महासाथीच्या आजारानंतर २०२२ मध्येही शेअर बाजारात मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला होता.
advertisement

क्रिप्टोपेक्षा सोने आणि चांदीवर विश्वास...

रॉबर्ट यांनी मे महिन्यातही असाच इशारा दिला होता. तेव्हापासून, १६ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक वाढली आहे. हे बाँड २० वर्षांसाठी जारी केले गेले होते. काही गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणे बिटकॉइनपेक्षा सुरक्षित आहे. रॉबर्ट म्हणाले की सोन्यात गुंतवणूक करणे त्याच्या डिजिटल स्वरूपात चांगले राहील.
advertisement
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)
view comments
मराठी बातम्या/मनी/
Share Market Crash : शेअर बाजारात येणार सुनामी...गुंतवणूकदारांना रेड अलर्ट, अब्जावधी बुडणार, दिग्गजाने केला मोठा दावा...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement