Share Market Prediction: शेअर्स बनवतील लाखांना कोट्यवधी, घेतले नाहीत तर पश्चाताप होईल; मार्केट तज्ज्ञांचा धडाकेबाज इशारा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction : संवत 2082 ची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी नव्या आशा आणि सोन्याच्या संधी घेऊन आली आहे. बाजारातील दिग्गजांनी सांगितलं आहे की या वर्षी PSU, मिडकॅप फार्मा, बँकिंग आणि अल्कोहोल सेक्टरमध्ये मोठी तेजी दिसू शकते.
मुंबई : दिवाळीच्या शुभ मुहूर्तानंतर नवीन संवत 2082 ची सुरुवात झाली आहे आणि शेअर बाजारात नव्या वर्षाबद्दल आशावादाचे वातावरण आहे. मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान बाजार हिरव्या चिन्हावर बंद झाला. ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. या पार्श्वभूमीवर CNBC-TV18 ने बाजारातील चार दिग्गज गुंतवणूक तज्ज्ञांशी रमेश दमाणी, दीपन मेहता, नीलेश शाह आणि धर्मेश कांत यांच्याशी संवाद साधला. या तज्ज्ञांनी नव्या वर्षात कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणुकीच्या संधी आहेत आणि कोणते शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात, याबद्दल सविस्तर चर्चा केली.
advertisement
सरकारी कंपन्या आणि मिडकॅप फार्मा वर बुलिश
शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार रमेश दमाणी यांनी सांगितले की, ते सरकारी कंपन्यांवर (PSUs) आणि शिपबिल्डिंग सेक्टरवर विश्वास ठेवत आहेत. सरकारच्या वाढत्या फोकसमुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. त्यांनी सांगितले की, ‘रेअर अर्थ’ (Rare Earth) संसाधनांची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि सरकार काही पीएसयूमध्ये कॅपेक्स (Capex) वाढवून या संसाधनांच्या शोध आणि प्रक्रिया (Exploration & Processing) क्षेत्रात गुंतवणूक वाढवेल. त्यामुळे संबंधित कंपन्यांना मोठा फायदा होईल.
advertisement
दमाणी यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि मिडकॅप फार्मा कंपन्यांवर देखील विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मते, 10,000 कोटींपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्या मिडकॅप फार्मा कंपन्यांमध्ये इनोव्हेशन आणि पेटंट तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या अनेक नवीन कंपन्या उदयास येत आहेत. पुढील काही वर्षांत हा सेक्टर चांगला परफॉर्म करेल.
advertisement
अल्कोहोल आणि बेव्हरेज सेक्टरवर लक्ष
दीपन मेहता यांचा फोकस अल्कोहोल अँड बेव्हरेज (AlcoBev) सेक्टरवर आहे. त्यांचा आवडता शेअर आहे Allied Blenders, जी कंपनी प्रीमियम प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून वॅल्यू चेनमध्ये वर जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडे मजबूत ब्रँड, वितरण नेटवर्क आणि वाढते मार्जिन्स आहेत, ज्यामुळे पुढे उत्तम परतावा मिळू शकतो.
advertisement
याशिवाय त्यांनी Tilaknagar Industries हा दुसरा शेअरही आवडता असल्याचे सांगितले. त्यांच्या मतानुसार, जर गुंतवणूकदार या दोन कंपन्यांमध्ये टिकून राहिले, तर हा सेक्टर पुढच्या काळात उत्कृष्ट रिटर्न देऊ शकतो. मात्र, राज्य सरकारांच्या नियमांतील बदलांमुळे काही वेळा अस्थिरता येऊ शकते.
advertisement
छोटे बँक आणि नवी अर्थव्यवस्था
नीलेश शाह यांच्या मते, आता स्मॉल बँक्ससाठी परिस्थिती अनुकूल होत चालली आहे. ते म्हणाले, या बँकांनी गेल्या काही काळात अंडरपरफॉर्म केलं, पण आता त्यांच्यासाठी वेळ बदलत आहे. क्रेडिट ऑफटेक आणि नेट इंटरेस्ट मार्जिन (NIMs) सुधारत आहेत, त्यामुळे री-रेटिंगची शक्यता वाढली आहे.
advertisement
यासोबतच त्यांनी डीकार्बोनायझेशन, इलेक्ट्रिफिकेशन आणि कंज्युमर अपॉर्च्युनिटी या क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांवर भर देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, मी वैयक्तिकरित्या Ather Energy मध्ये गुंतवणूक केली आहे. इलेक्ट्रिक वाहनं आणि ग्रीन एनर्जी यांचा पुढचा दशकात मोठा प्रभाव राहील.
ऑरियनप्रो, रिलायन्स आणि बँक ऑफ इंडिया वर दांव
धर्मेश कांत यांच्या आवडत्या शेअर्सची यादी स्पष्ट आणि दिर्घकालीन आहे.
1) Aurionpro Solutions – ते या शेअरचा टार्गेट 1,675 पर्यंत पाहत आहेत. त्यांनी सांगितले, कंपनीला SBI कडून मोठा ऑर्डर मिळाला आहे. ज्यामुळे इतर बँकांकडूनही काम मिळण्याची शक्यता आहे. कंपनीचे डेटा सेंटर, मोबिलिटी, ट्रांझिट आणि टिकेटिंग सोल्यूशन्स हे मुख्य महसूल स्रोत आहेत.
2)Reliance Industries – कांत यांच्या मते, जर गुंतवणूकदारांनी 2-3 वर्षांचा धीर धरला, तर रिलायन्स मल्टिबॅगर ठरू शकतो. त्यांचा टार्गेट 1,650 पर्यंत आहे.
3)Bank of India – या शेअरबाबत ते म्हणाले, हा स्टॉक सध्या अंडरव्हॅल्यूड आहे. सुमारे 0.6 प्राइस-टू-बुक व्हॅल्यू वर ट्रेड होत आहे. बँकेची लोन ग्रोथ 14% दराने वाढतेय आणि अॅसेट क्वालिटी सुधारतेय. हा पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याजोगा मजबूत शेअर आहे.
संवत 2082 साठी हे तज्ज्ञ एकमताने आशावादी आहेत. सरकारी कंपन्या, मिडकॅप फार्मा, अल्कोहोल सेक्टर, छोटे बँकिंग स्टॉक्स आणि तंत्रज्ञान-आधारित कंपन्या या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत. भारतीय बाजार आगामी वर्षात ऊर्जा, इनोव्हेशन आणि स्थिरतेच्या त्रिकूटावर चालणारा बुल फेज पाहू शकतो, असा सर्वांचा अंदाज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 11:25 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market Prediction: शेअर्स बनवतील लाखांना कोट्यवधी, घेतले नाहीत तर पश्चाताप होईल; मार्केट तज्ज्ञांचा धडाकेबाज इशारा