Share Market: अस्थिर शेअर मार्केटमध्येही 10 स्टॉक मिळवून देतील छप्परफाड कमाई
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
येत्या काळात शेअर मार्केटमधून पैसे काढण्याची घाई करू नये कारण येणारा काळ गुंतवणूकदारांसाठी चांगला ठरेल असा अंदाज ब्रोकरेज फर्मने व्यक्त केलाय.
मुंबई: भारतीय शेअर बाजार सध्या रिकव्हरी मोडवर आहे. आज शेअर मार्केटमध्ये IT सेक्टर सोडून बाकीचे स्टॉक्स हळूहळू रिकव्हर होताना दिसले. या वर्षाच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये अनेक चढ उतार नफा तोटा होत असला तरी वर्षाअखेरपर्यंत शेअर मार्केट 1 लाख 5 हजार अंकांपर्यंत पोहोचेल असा अंदाज ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने वर्तवला आहे. येत्या काळात शेअर मार्केटमधून पैसे काढण्याची घाई करू नये कारण येणारा काळ गुंतवणूकदारांसाठी चांगला ठरेल असा अंदाज ब्रोकरेज फर्मने व्यक्त केलाय.
मॉर्गन स्टॅनलीच्या अंदाजानुसार, या वर्षाच्या अखेरीस बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1,05,000 पर्यंत पोहोचू शकतो. ब्रोकरेज फर्मने असा अंदाज वर्तवण्याची ३०% शक्यता वर्तवली आहे. तेलाच्या किमती प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली राहतील, ज्यामुळे देशांतर्गत महागाई कमी होईल, अशी अपेक्षा ब्रोकरेज फर्मला आहे. यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) व्याजदरात आणखी कपात करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.
advertisement
सरकारचे सुधारणा कार्यक्रमही विकासाला चालना देऊ शकतात, ज्यात जीएसटी दरात कपात आणि कृषी क्षेत्रातील सुधारणांचा समावेश आहे. या तेजीमुळे सेन्सेक्सची कमाई 2024-2027 या आर्थिक वर्षात वार्षिक 20 % दराने वाढण्याची शक्यता आहे.
बेस केसमध्ये काय होईल?
बेस केससाठी मॉर्गन स्टॅनलीने 50 % शक्यता गृहीत धरली आहे. त्यानुसार सेन्सेक्सचा लक्ष्य 93,000 अंकावर ठेवण्यात आला आहे. या परिस्थितीत, ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की 2027 पर्यंत व्याजदरात किरकोळ घट, सकारात्मक लिक्विडिटी वातावरण आणि सेन्सेक्सची कमाई वार्षिक 17 % दराने वाढेल.
advertisement
बेअर केसमध्ये फर्म काय म्हणते?
बेअर केसमध्ये मॉर्गन स्टॅनलीने सेन्सेक्सचा लक्ष्य 70,000 सांगितला आहे आणि असे होण्याची 20 % शक्यता वर्तवली आहे. या परिस्थितीत तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आरबीआय मॅक्रो स्थिती स्थिर ठेवण्यासाठी व्याजदर कठोर करेल. हे अमेरिका (US) सह जगभरातील देशांमध्ये मंदीचे संकेत देखील देते. येथे, सेन्सेक्सची कमाई 2026 पर्यंत वार्षिक 15 % दराने वाढण्याचा अंदाज आहे आणि खराब मॅक्रो परिस्थिती दर्शवण्यासाठी इक्विटी मल्टीपल कमी केला जाईल.
advertisement
या आधारावर मॉर्गन स्टॅनली फायनान्शियल्स, कस्टमर डिस्क्रिशनरी, इंडस्ट्रियल्स आणि टेक्नॉलॉजी स्टॉक यांसारख्या क्षेत्रांवर "ओव्हरवेट" आहे. तर, कंज्युमर स्टेपल, एनर्जी, हेल्थकेअर, युटिलिटीज आणि मटेरियल्सवर "अंडरवेट" आहे. ब्रोकरेज फर्मने या दरम्यान त्यांच्या फोकस लिस्टमध्ये 10 शेअर्सचा समावेश केला आहे. ते कोणते आहेत याची लिस्ट पाहुया.
ब्रेनबीज सोल्यूशन्स: याला 818 रुपयांचा प्राइस टार्गेट देण्यात आला असून 29% वाढीची शक्यता आहे.
advertisement
मारुती सुझुकी: 14,124 रुपयांच्या टार्गेटसह 19% वाढ होऊ शकते.
ट्रेंट: 8,032 रुपयांच्या टार्गेटसह 11% वाढ होण्याची शक्यता.
रिलायन्स इंडस्ट्रीज: नुकताच दबाव कमी झाल्याने पुन्हा स्थिर होण्याची शक्यता आहे.
आयसीआयसीआय बँक: 1,650 रुपयांच्या टार्गेटसह 30% वाढ होऊ शकते.
एसबीआय लाइफ: 2,240 रुपयांच्या टार्गेटसह 52% वाढीची अपेक्षा.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स: 5,292 रुपयांच्या टार्गेटसह 27% वाढ होऊ शकते.
advertisement
एल अँड टी: 3,875 रुपयांच्या टार्गेटसह 5% वाढीची शक्यता.
इन्फोसिस: 2,150 रुपयांच्या टार्गेटसह 10% वाढ होऊ शकते.
अल्ट्राटेक सिमेंट: 13,620 रुपयांच्या टार्गेटसह 15% वाढीचा अंदाज.
(डिस्क्लेमर: न्यूज 18 मराठीने केवळ ही माहिती युजर्सच्या माहितीसाठी दिली आहे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जोखमीची आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नफ्या तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 2:30 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: अस्थिर शेअर मार्केटमध्येही 10 स्टॉक मिळवून देतील छप्परफाड कमाई