advertisement

साताऱ्यात शरद पवार गटाच्या नेत्यावर हल्ला, भाजप उमेदवाराच्या भावाकडून मारहाण, मतदानाआधी तुफान राडा

Last Updated:

सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे.

News18
News18
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे. पाल जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून उंब्रज पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण केली. बाळासाहेब चोरेकर हे देवदर्शनावरून परतत असताना हा हल्ला झाला.
मारहाण झालेल्या बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर इनोव्हा गाडीतून आले होते. त्यांनी गाडी अडवून चोरेकर यांना मारहाण केली. पाल जिल्हा परिषद गटातील वर्चस्वावरून हा वाद झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.
advertisement

पोलीस ठाण्यात नेत्यांची धाव

या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे उमेदवार देवराज पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
advertisement
उद्या या गटासाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच झालेल्या या मारहाणीमुळे पाल गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याप्रकरणी आता उंब्रज पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साताऱ्यात शरद पवार गटाच्या नेत्यावर हल्ला, भाजप उमेदवाराच्या भावाकडून मारहाण, मतदानाआधी तुफान राडा
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement