2 मिनिटांत 300000 कोटी पैशांचा पाऊस, शेअर मार्केटमध्ये मोठी उलाढाल, ट्रम्प यांच्या निर्णयानं बदलला मूड

Last Updated:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर टॅरिफ स्थगित केल्याने भारतीय शेअर बाजारात उसळी, गुंतवणूकदारांची संपत्ती 3 लाख कोटींनी वाढली. सेन्सेक्स 467.56 अंकांनी वाढला.

News18
News18
मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर 25 टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली. त्यामुळे जागतिक आणि आशियाई शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसला आहे. बाजार सुरू झाल्यानंतर केवळ दोन मिनिटांतच गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा होता होता वाचला आहे. त्यामुळे शेअर मार्केट पुन्हा रिकव्हरी मोडवर येईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
शेअर मार्केटमध्ये अच्छे दिन
इक्विटी बेंचमार्क इंडेक्स, सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टी 50 (Nifty 50) दोन्ही तेजीने व्यवहार करत आहेत. निफ्टीवरील सर्व इंडेक्स ग्रीन झोनमध्ये आहेत, तर ऑटो सेक्टरने सर्वाधिक आधार दिला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे.
किती कोटींचा झाला फायदा
सेन्सेक्स 467.56 अंकांनी (0.61%) वाढून 77,654.30 वर आहे. निफ्टी 50 146.65 अंकांनी (0.63%) वाढून 23,507.70 वर पोहोचला आहे. सोमवारच्या व्यवहारात सेन्सेक्स 319.22 अंकांनी घसरून 77,186.74 वर बंद झाला होता, तर निफ्टी 121.10 अंकांनी घसरून 23,361.05 वर बंद झाला होता. सोमवारी 3 फेब्रुवारी 2025 रोजी, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 4,19,54,829.60 कोटी रुपये होते. आज, 4 फेब्रुवारी 2025 रोजी बाजार सुरू झाल्यानंतर हे 4,22,57,970.28 कोटी रुपये झाले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती 3,03,140.68 कोटी रुपयांनी वाढली आहे.
advertisement
सेन्सेक्सवरील 24 शेअर्स ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्सवरील 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. सर्वाधिक वाढ एमअँडएम (M&M), टाटा मोटर्स (Tata Motors) आणि इन्फोसिस (Infosys) यामध्ये आहे. मात्र, पावरग्रिड, एचयूएल आणि नेस्ले यामध्ये घसरण दिसून येत आहे. बीएसईवरील 2402 शेअर्सपैकी 1713 शेअर्सची किंमत वाढली आहे.
अपर सर्किट लोअर सर्किट काय स्थिती?
570 शेअर्स शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 19 शेअर्स वर्षाच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. बीएसईवरील 19 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर पोहोचले आहेत, तर 21 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. अपर आणि लोअर सर्किटचा विचार करायचा झाला तर 58 शेअर्स अपर सर्किटवर तर 65 शेअर्स लोअर सर्किटवर आहेत.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
2 मिनिटांत 300000 कोटी पैशांचा पाऊस, शेअर मार्केटमध्ये मोठी उलाढाल, ट्रम्प यांच्या निर्णयानं बदलला मूड
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement