LPG ग्राहकांसाठी नवा नियम लागू; सिलेंडर घेण्यासाठी आता बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आवश्यक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मंत्रालयाने आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून ही माहिती दिली आहे की, सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांनी 'बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन' (e-KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेकदा अशा कामांसाठी एजन्सीबाहेर तासनतास उभं राहावं लागतं, पण यावेळी सरकारने दिलासा दिला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि गॅस एजन्सीच्या बाहेर एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतंय. "गॅस मिळणार का?" "पुरवठा बंद होणार का?" अशा प्रश्नांनी सर्वसामान्यांच्या मनात घर केलंय. घराघरात गृहिणी गॅस जपून वापरत आहेत, तर दुसरीकडे हॉटेल आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर चिंतेचे ढग दाटले असतानाच, केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
जर तुम्हीही घरगुती गॅस ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आता प्रत्येक ग्राहकासाठी एक अनिवार्य नियम लागू केला आहे, ज्याचा थेट संबंध तुमच्या गॅस कनेक्शनच्या वैधतेशी आहे.
मंत्रालयाने आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून ही माहिती दिली आहे की, सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांनी 'बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन' (e-KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेकदा अशा कामांसाठी एजन्सीबाहेर तासनतास उभं राहावं लागतं, पण यावेळी सरकारने दिलासा दिला आहे.
advertisement
घरी बसून करा व्हेरिफिकेशन, ग्राहकांना आता त्यांच्या घरात आरामात हे काम पूर्ण करता येईल. यासाठी तुम्हाला फक्त संबंधित ऑइल मार्केटिंग कंपनीचे (उदा. Indane, HP, Bharat Gas) अधिकृत मोबाईल ॲप आणि Aadhaar FaceRD हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
दुसरा पर्याय
जर तुम्हाला ॲप वापरणे कठीण जात असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस वितरकाकडे (Distributor) जाऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटलाही भेट देऊ शकता.
advertisement
भारतात सध्या गॅसचा तुटवडा का जाणवतोय?
याचं उत्तर दडलंय पश्चिम आशियातील युद्धात. भारताच्या एकूण एलपीजी आयातीपैकी जवळपास 90 टक्के आयात ही 'स्ट्रोट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) मार्गे होते. मात्र, युद्धाच्या तणावामुळे हा मार्ग जवळजवळ बंद झाल्यासारखा आहे. यामुळे देशात पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी लोकांनी भीतीपोटी जास्तीचे सिलेंडर बुक करायला सुरुवात केली आहे. यामुळेच प्रत्यक्षात साठा असला तरी तुटवडा असल्याचा आभास निर्माण होत आहे.
advertisement
हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना मोठा फटका
घरगुती वापरापेक्षा व्यावसायिक क्षेत्रावर याचा परिणाम जास्त गंभीर आहे.
रेस्टॉरंट्स पूर्णपणे 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरवर अवलंबून असतात. ओव्हन, फ्रायर्स आणि ग्रिल्ससाठी या गॅसची मोठी गरज असते. पुरवठा अनियमित झाल्याने छोट्या खानावळी आणि हॉटेल्सना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. मोठी रेस्टॉरंट्स चेन कशाबशा पद्धतीने आपले काम सुरू ठेवत आहेत, पण त्यांच्यावरही मर्यादा आल्या आहेत. यामुळेच आता अनेक विक्रेते इंडक्शन किंवा इतर पर्यायांच्या शोधात आहेत.
advertisement
एकूणच, जागतिक परिस्थितीमुळे गॅसचा प्रश्न गंभीर होत असला, तरी सरकारने e-KYC च्या माध्यमातून वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, आपले व्हेरिफिकेशन पूर्ण करणे आणि गॅसचा वापर योग्य पद्धतीने करणे हाच सध्याचा उत्तम मार्ग आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 7:49 PM IST
मराठी बातम्या/मनी/
LPG ग्राहकांसाठी नवा नियम लागू; सिलेंडर घेण्यासाठी आता बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आवश्यक








