Share Market साठी मोठे वॉर्निंग, बाजारात मोठे Correction होणार; अंदाज ऐकून गुंतवणूकदार चिंतेत
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: जगातील दोन मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅन्लीच्या मते, शेअर बाजार कोणत्याही क्षणी 10 ते 20 टक्क्यांनी कोसळू शकतो आणि ही घसरण छोट्या गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
मुंबई: जर तुम्ही सध्या शेअर बाजारात पैसा गुंतवत असाल, तर थोडं थांबा आणि विचार करा; कारण जगातील दोन सर्वात मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँका Goldman Sachs आणि Morgan Stanley यांनी गुंतवणूकदारांना थेट चेतावणी दिली आहे. त्यांच्या मते, शेअर मार्केटमध्ये 10 ते 20 टक्क्यांची घसरण (Correction) येऊ शकते.
advertisement
का दिला हा इशारा
गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील शेअर बाजार एकाच दिशेने धावत आहेत म्हणजेच सततची तेजी. AI कंपन्यांमधील वाढ, व्याजदरात कपातीच्या अपेक्षा आणि कंपन्यांचे मजबूत निकाल या सगळ्यांमुळे बाजाराने नवीन उच्चांक गाठले आहेत. अमेरिका, जपान, कोरिया आणि चीन या सर्व देशांचे शेअर इंडेक्स रेकॉर्ड लेव्हलवर पोहोचले आहेत.
advertisement
OYOने वादग्रस्त निर्णय रद्द केला; लोक म्हणाले, ही सरळ फसवणूक- आता सगळ्यांसाठी...
पण या दोन्ही बँकांच्या मते, आगामी वर्षांमध्ये आशिया विशेषतः भारत, चीन, जपान आणि हाँगकाँग हे जगाच्या वाढीचं (Growth Story) केंद्र बनतील. भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील वेगवान प्रगती, तसेच जपानमधील कॉर्पोरेट रिफॉर्म्स या दोन गोष्टींमुळे मार्केटसाठी दीर्घकालीन सकारात्मक वातावरण तयार होईल.
advertisement
मात्र Goldman Sachs आणि Morgan Stanley यांचं म्हणणं आहे की- जे काही खूप वेगाने वाढतं, त्याला कधीतरी थांबून श्वास घ्यावा लागतो. म्हणजेच, मोठ्या रॅलीनंतर बाजारात थोडी घसरण येणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे.
advertisement
कोणीच सेफ नाही, लाखो लोक उद्ध्वस्त होतील; जग हादरवणारी भविष्यवाणी, कसे वाचवाल?
David Solomon, CEO, Goldman Sachs यांच्या म्हणण्यानुसार, पुढील 12 ते 24 महिन्यांमध्ये शेअर बाजारात 10 ते 20 टक्क्यांपर्यंत घसरण येऊ शकते. मात्र ही घसरण दीर्घकालीन बुल रनचाच भाग असेल. अशा छोट्या-मोठ्या धक्क्यांपासून घाबरण्याची गरज नाही. गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओचं पुनरावलोकन करावं (Rebalance करावं), पण बाजारातून पळ काढू नये. म्हणजेच आता घाबरण्याचा नाही तर हुशारी दाखवण्याचा काळ आहे.
advertisement
मॉर्गन स्टॅन्लीचे सीईओ टेड पिक यांचे मत
Ted Pick, CEO, Morgan Stanley यांनी सांगितले की, बाजारात 10 ते 15 टक्क्यांचा पुलबॅक काही वाईट गोष्ट नाही. जर ही घसरण एखाद्या मोठ्या संकटामुळे नसेल, तर ती फक्त नफा वसुलीमुळे आलेली हेल्दी Correction मानली जाते. त्यांच्या मते बाजारालाही अधूनमधून थंड होण्याची गरज असते, जेणेकरून तो नंतर पुन्हा जोमाने वर जाऊ शकेल.
advertisement
घाबरण्याची नाही, तर...
IMF, अमेरिकेचा फेडरल रिझर्व्ह प्रमुख जेरोम पॉवेल (Jerome Powell) आणि ब्रिटनच्या बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर अँड्रू बेली (Andrew Bailey) यांनीसुद्धा आधीच इशारा दिला आहे की, सध्याच्या घडीला जागतिक बाजाराचे व्हॅल्यूएशन खूप जास्त आहे. त्यामुळे जर बाजार थोडासा खाली आला, तर त्याला क्रॅश समजू नका, तो एक सामान्य Correction आहे.
सोलोमन आणि पिक या दोघांचं म्हणणं एकच आहे की- ज्यांचा पोर्टफोलिओ मजबूत आहे. त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. ही घसरण तात्पुरती असेल.
गुंतवणूकदारांसाठी संदेश
जर तुम्ही लांब पल्ल्याच्या दृष्टीने चांगल्या दर्जाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, तर चिंता करू नका. छोटे गुंतवणूकदार या घसरणीच्या काळात हळूहळू SIP वाढवू शकतात किंवा चांगल्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी करू शकतात.
-जास्त चढलेले किंवा ओव्हरव्हॅल्यूड शेअर्सपासून थोडं अंतर ठेवा.
-टायमिंग पकडायचा प्रयत्न करू नका, कारण ‘डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टिंग’ हेच सर्वात मोठं शस्त्र आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 10:45 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market साठी मोठे वॉर्निंग, बाजारात मोठे Correction होणार; अंदाज ऐकून गुंतवणूकदार चिंतेत


