Harmanpreet Net Worth: हरमनप्रीतकडे सरकारी नोकरी, कमाई ऐकून डोळे विस्फाराल; कोटींचं साम्राज्य कसं उभं केलं?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Harmanpreet Kaur net worth :भारतीय महिला क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. तिने केवळ विश्वचषक जिंकला नाही, तर आपल्या कामगिरीने आणि 25 कोटींच्या संपत्तीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या अदम्य जिद्दीच्या जोरावर ICC महिला विश्वचषकाची ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हे मोठे यश संपादन केले आहे. हरमनप्रीतने केवळ उत्कृष्ट नेतृत्व केले नाही, तर आपल्या फलंदाजीनेही अप्रतिम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. ती महिला विश्वचषक जिंकणारी सर्वांत ज्येष्ठ कर्णधार ठरली आहे. तिचं वय 36 वर्षे आणि 239 दिवस इतके आहे. क्रिकेटच्या मैदानावर तिची दमदार कामगिरी जितकी प्रसिद्ध आहे, तितकीच ती कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहे. मुंबईपासून पटियाला पर्यंत तिची आलिशान मालमत्ता पसरलेली आहे.
advertisement
संपत्ती तब्बल....
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ICC महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी मात करत ट्रॉफी आपल्या नावावर केली. क्रिकट्रॅकरच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2024–25 पर्यंत हरमनप्रीत कौरची एकूण संपत्ती सुमारे 25 कोटी रुपये होती. या संपत्तीत तिच्या क्रिकेट करिअरमधील सर्व फॉरमॅटमधून होणाऱ्या कमाईबरोबरच ब्रँड एंडोर्समेंट्समधून मिळणारे उत्पन्नही समाविष्ट आहे. हेही लक्षात घेण्यासारखं आहे की हरमनप्रीत सध्या WPL (Women's Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार आहे.
advertisement
BCCI कडून मिळणारे मानधन
साल 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना हरमनप्रीतने केलेली 171 धावांची धडाकेबाज खेळी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ‘A’ श्रेणीतील कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. या अंतर्गत तिला दरवर्षी 50 लाख रुपयांचे मानधन मिळते. याशिवाय...
advertisement
एका टेस्ट सामन्यासाठी 15 लाख रुपये
एका वनडे सामन्यासाठी 6 लाख रुपये
आणि T20 सामन्यासाठी 3 लाख रुपये असे स्वतंत्र मानधन दिले जाते.
WPL आणि इतर लीग्समधून कमाई
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच हरमनप्रीत इतर अनेक लीग्समधूनही भरघोस कमाई करते. महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार म्हणून ती दर सिझनला सुमारे 1.80 कोटी रुपयांचे वेतन घेते. याशिवाय, ती अनेक परदेशी क्रिकेट लीग्समध्येही खेळली असून त्यातून तिने लाखो रुपयांची कमाई केली आहे. तसेच हरमनप्रीत पंजाब पोलिसांमध्ये उपपोलिस अधीक्षक (DSP) या पदावर कार्यरत असून, त्यातून मिळणारे वेतनही तिच्या एकूण नेटवर्थमध्ये भर घालते.
advertisement
ब्रँड एंडोर्समेंटमधून प्रचंड उत्पन्न
हरमनप्रीत केवळ क्रिकेटपटूच नाही, तर अनेक प्रतिष्ठित ब्रँड्सची चेहरा आहे. रिपोर्टनुसार ती दरवर्षी ब्रँड एंडोर्समेंटमधून 40 ते 50 लाख रुपये कमावते. प्रत्येक जाहिरातीच्या शूटसाठी तिला 10 ते 12 लाख रुपये दिले जातात. ती ज्या नामांकित ब्रँड्ससाठी काम करते त्यात HDFC Life, ITC, Boost, CEAT, PUMA, Tata Safari, Asian Paints, Jaipur Rugs, The Omaxe State यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
advertisement
आलिशान घरं आणि वाहनं
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरकडे मुंबईपासून पटियाला पर्यंत आलिशान मालमत्ता आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासह पटियालामधील भव्य बंगल्यात राहते. तिच्याकडे मुंबईतही एक सुंदर आलिशान घर आहे, जे तिने 2013 साली खरेदी केले होते. हरमनकडे विंटेज जीप आणि Harley-Davidsonसारख्या महागड्या बाइक्स आहेत. तिच्या कार आणि बाईक कलेक्शनमधून तिच्या लक्झरी लाइफस्टाइलची झलक दिसून येते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 6:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Harmanpreet Net Worth: हरमनप्रीतकडे सरकारी नोकरी, कमाई ऐकून डोळे विस्फाराल; कोटींचं साम्राज्य कसं उभं केलं?


