Fake Paneer : तुम्ही खाताय ते खरंच पनीर आहे का? सणासुदीच्या काळात फसवणूक वाढली, आरोग्यासाठी किती धोकादायक?

Last Updated:

Fake Paneer In Mumbai : पनीरच्या नावाखाली चीझ अ‍ॅनालॉग नावाचा पदार्थ विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात नागरिक पनीरची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

News18
News18
मुंबई : आपल्या दैनंदिन आहारात पनीरला विशेष महत्त्व आहे. विशेषत हा सणासुदीच्या दिवसांत पनीरच्या भाज्या, विविध प्रकारचे स्नॅक्स आणि मिठाया बनवल्या जातात. पण हे पनीर खरेच शुद्ध आहे का, याबाबत आता शंका उपस्थित झाली आहे. कारण गणेशोत्सव आणि इतर सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेऊन काही नफेखोरांनी पनीरच्या नावाखाली बनावट पदार्थ म्हणजेच 'चीझ अ‍ॅनालॉग' विक्रीला आणले आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून ही धक्कादायक बाब उघड झाली.
अ‍ॅन्टॉप हिलमध्ये छापा
पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. अ‍ॅन्टॉप हिल परिसरातील जीटीबी नगर भागात दोन डेअरींवर छापा टाकण्यात आला. 'ओम कोल्ड्रींक हाऊस' आणि 'श्री गणेश डेअरी' या दुकानांमध्ये पनीरच्या नावाखाली ग्राहकांना चीझ अ‍ॅनालॉग विकले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
advertisement
सीबी कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक रोहन बगाडे, महेश सांगळे तसेच पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर बोरोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या छाप्यात तब्बल 550 किलो भेसळयुक्त चीझ अ‍ॅनालॉग जप्त करण्यात आले. ही मात्रा बाजारात गेली असती तर असंख्य ग्राहकांच्या आरोग्याशी मोठा धोका निर्माण झाला असता.
खरी आणि बनावट ओळख कशी करावी?
ग्राहकांनी पनीर खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात :
advertisement
1)नेहमी विश्वसनीय ब्रँड व लेबलबद्ध पॅकिंग असलेलेच पनीर घ्यावे.
2)सुट्टे किंवा लेबल नसलेले पनीर खरेदी करण्याचे टाळावे.
3)खरे पनीर दाणेदार स्वरूपाचे असते आणि  त्याला नैसर्गिक दुधाचा गंध येतो.4
4)तर बनावट पनीर अथवा चीझ अ‍ॅनालॉग हाताला खरासारखे किंवा मेणासारखे वाटते.
ही साधी ओळख लक्षात घेतल्यास भेसळयुक्त पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात पोहोचण्यापासून रोखता येईल.
advertisement
व्यापाऱ्यांना इशारा
भेसळयुक्त पनीर हॉटेल व्यावसायिक, केटरिंग करणारे लोक स्वस्त दरात खरेदी करतात. पण यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा पदार्थांचा साठा ठेवणे किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या गैरव्यवहारात सहभागी आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Fake Paneer : तुम्ही खाताय ते खरंच पनीर आहे का? सणासुदीच्या काळात फसवणूक वाढली, आरोग्यासाठी किती धोकादायक?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement