मोठी बातमी! नवी मुंबईतून कोकेन, हेरॉईनाच मोठा साठा जप्त; 75 नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नवी मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई, 3 सप्टेंबर, विवेक गुप्ता : नवी मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 75 नायजेरियन नागरिकांना तब्यात घेतलं आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही छापेमारी करण्यात आली. पोलिसांना पहाताच अमली पदार्थ तस्करांनी त्यांच्याजवळ असलेलं ड्रग्ज बाहेर फेकलं. पळून जाण्याचा प्रयत्नही केला मात्र या प्रकरणात पोलिसांनी अनेक ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेतलं आहे. घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
विविध भागांमध्ये छापेमारी
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी पोलिसांनी नवी मुंबईतील विविध भागांमध्ये छापेमारी केली. पोलीस ज्या ठिकाणी अमली पदार्थांची तस्करी सुरू होती, त्या ठिकाणचा दरवाजा तोडून आत घुसले. पोलिसांना पहाताच ड्रग्ज तस्करांनी आपल्याजवळ असलेले विविध प्रकारचे अमली पदार्थ खाली फेकले तसेच पळून जाण्याचा प्रयत्नही केला. या कारवाईत पोलिसांनी 75 नायजेरीयन नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कोकेन आणि हेरॉईनचा साठा घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
advertisement
पोलिसांच्या कारवाईनं खळबळ
दरम्यान पोलिसांच्या या कारवाईमुळं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोकेन आणि हेरॉईन जप्त केलं आहे. त्यामुळे नवी मुंबईत अमली पदार्थ तस्करांचा सुळसुळाट वाढल्याचं समोर आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2023 11:00 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! नवी मुंबईतून कोकेन, हेरॉईनाच मोठा साठा जप्त; 75 नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात