Uttan-Virar Sea Link : 2 तासांचा प्रवास 40 मिनिटांत होणार; मरीन ड्राईव्ह ते विरार ट्रेनपेक्षा लवकर गाठणार
Last Updated:
Sea Link Update : आता तुम्हाला विरारहून मरीन ड्राईव्हला येण्यासाठी ट्रेनचा जास्त वेळ प्रवास करण्याची गरज नाही. मुंबई उपनगरातील नागरिकांना एक नवा पर्याय मिळणार आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता अटल सेतू पेक्षा लांब आणि कमीत-कमी वेळात अंतर पार होण्यासाठी दुसरा एक पर्याय लवकरच मिळणार आहे. यासाठी राज्य सरकाने सविस्तर प्रकल्प अहवाला मंजूरी देलेली असून पर्यावरणा संबंधित आवश्यक परवानग्याही मिळाल्या आहेत.
कसा असेल हा नवा मार्ग
मुंबईचा सागरी किनारी मार्ग असलेल्या उत्तरेकडील बाजूस हा नवा उत्तन-विरार सी लिंक प्रकल्प हाती घेण्यात आलेला असून हा प्रकल्प तब्बल 55.12 किमी लांब असणार आहे. नव्या मार्गामुळे दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट आणि विरार ते पुढे पालघरपर्यंत प्रवास वेगवान आणि अतिशय सोयीस्कर होणार आहे. जो उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीला जोडणारा तब्बल 8 पदरी मार्ग असणार आहे.
advertisement
सध्या या प्रवासाला किती वेळ लागतो?
सध्या या प्रवासाला 90 मिनिटे लागतात पण या नव्या मार्गामुळे अवघ्या 30 ते 40 मिनिटांचा प्रवास होणार आहे. एक सागरी पूल तसेच अप्रोच मार्ग आणि अनेक इंटरचेंजेचा पर्याय प्रवाशांना मिळणार आहे.
पहिला टप्पा कुठे असणार?
नव्या प्रकल्पाचं काम सध्या दोन टप्प्यात पूर्ण होणार असल्याची माहिती मिळत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरारदरम्यान 24.35 लांब सागरी पुलाने भाईंदरजवळ जोडणी मिळणार आणि त्यात सी लिंक, अप्रोच मार्गांचा समावेश असेल. शिवाय यामध्ये उत्तनतला जोडणारा 9.32 किमी लांब मार्ग तर विरारपर्यंत जोडणारा 18.95 किमी लांब मार्ग आणि वसईला जोडणारा 2.5 किमी लांब मार्गांचा समावेश असणार आहे.
advertisement
दुसरा टप्पा कुठे असणार?
या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात हा मार्ग पुढे पालघरपर्यंत जोडण्यात येणार आहे. शिवाय या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच एसव्ही रोड, लिंक रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. तर उत्तन-भाईंदर आणि वसई-विरारला थेट मुंबई शहराशी जोडणी मिळणार आहे. विशेष म्हणजे हा दुसरा टप्पा सुरु होताच नवीन होणाऱ्या वाढवण बंदरालाही जोडणी मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 8:02 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Uttan-Virar Sea Link : 2 तासांचा प्रवास 40 मिनिटांत होणार; मरीन ड्राईव्ह ते विरार ट्रेनपेक्षा लवकर गाठणार









