advertisement

आधी अडचण, आता नागरिकांना मिळणार दिलासा, कोस्टल रोडवर ही सुविधा सुरू

Last Updated:

आतापर्यंत या परिसरात स्वच्छतागृहांची कमतरता ही मोठी अडचण होती. हीच बाब लक्षात घेऊन आता कोस्टल रोडवर नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

मुंबईतील कोस्टल रोड परिसरात नागरिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी सौरऊर्जेवर कार्यरत
मुंबईतील कोस्टल रोड परिसरात नागरिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी सौरऊर्जेवर कार्यरत
मुंबई : कोस्टल रोड हा केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर नागरिकांच्या विरंगुळ्यासाठीही महत्त्वाचा ठरत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत विकसित करण्यात आलेल्या विहार क्षेत्रांमुळे येथे रोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक गर्दी करतात. मात्र आतापर्यंत या परिसरात स्वच्छतागृहांची कमतरता ही मोठी अडचण होती. हीच बाब लक्षात घेऊन आता कोस्टल रोडवर नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
आधी अडचण, आता दिलासा
कोस्टल रोडवरील विहार क्षेत्रांमध्ये पादचारी आणि पर्यटकांसाठी स्वतंत्र, स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या घनकचरा आणि व्यवस्थापन विभागाने कोस्टल रोडवर सहा ठिकाणी अत्याधुनिक बायो-टॉयलेट्सची उभारणी केली आहे. पादचारी भुयारी मार्ग क्रमांक 2, 4, 6, 11, 12, आणि 14 या ठिकाणी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
advertisement
सौरऊर्जेवर चालणारी अत्याधुनिक सुविधा
नवीन उभारण्यात आलेली ही मॉड्युलर बायो-टॉयलेट्स सौरऊर्जेवर कार्यरत असणार आहेत. प्रत्येक शौचालयामध्ये महिलांसाठी दोन स्वतंत्र सुविधा (एक पाश्चिमात्य आणि एक भारतीय पद्धतीचे), पुरुषांसाठी दोन, बालकांसाठी एक आणि दिव्यांगांसाठी एक स्वतंत्र पाश्चिमात्य पद्धतीचे शौचालय उपलब्ध आहे. याशिवाय सहा युरिनल, तीन वॉशबेसिन, सेन्सरवर आधारित आरसे, साबण डिस्पेन्सर, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटरसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. पाण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेची टाकी तसेच तीन हजार लिटर क्षमतेचा डीआरडीओ बायो-डायजेस्टर बसवण्यात आला आहे.
advertisement
अमरसन्स उद्यानाजवळ, आकृती इमारत वाहनतळ परिसर, हाजी अली जंक्शन, वरळी दुग्धशाळेसमोर, बिंदूमाधव ठाकरे चौकाजवळ आणि खान अब्दुल गफार खान मार्गालगत या ठिकाणी नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या शौचालयांसाठी नाममात्र पाच रुपये शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
आधी अडचण, आता नागरिकांना मिळणार दिलासा, कोस्टल रोडवर ही सुविधा सुरू
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement