आधी कपडे काढायला लावले, मग अश्लील.., रेड मारायला गेलेल्या व्यक्तीचं थायलंडच्या तरुणीसोबत नको ते कृत्य
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईतील देहविक्री रॅकेटप्रकरणी छापा मारण्यासाठी पोलिसांसोबत गेलेल्या एका व्यक्तीने छापेमारीदरम्यान, एका थायलंडच्या तरुणीसोबत नको तेच कृत्य केलं आहे.
मागील महिन्यात आरसीएफच्या पोलिसांनी मुंबईच्या चेंबूर परिसरातील युवान स्पा सेंटरवर छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी सेक्स रॅकेट प्रकरणात ८ थायलंडच्या मुलींची सुटका केली होती. मात्र आता या प्रकरणात एक महिन्याने मोठा ट्विस्ट आला आहे. छापा मारण्यासाठी पोलिसांसोबत गेलेल्या एका व्यक्तीने छापेमारीदरम्यान, एका थायलंडच्या तरुणीसोबत नको तेच कृत्य केलं आहे. या घटनेनंतर या प्रकरणातील एका तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी चेंबूरच्या युवान थाई स्पावर पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ग्राहक, मॅनेजर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करत थायलंडच्या तरुणींसह महिलांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर सर्व महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आलं होतं.
या घटनेच्या महिनाभरानंतर या रेडमधील ३८ वर्षीय महिला स्पा थेरेपीस्टने २४ तारखेला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. थेरेपीस्टच्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपीनं सायंकाळी पावणे सहा वाजता एक तासासाठी डीप टिश्यू स्पा थेरेपी बुक केली. ठरल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीला बुक केलेल्या थेरपीची माहिती देऊन, मसाज देत असताना त्याने अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्याला विरोध करताच, त्याने धमकाविण्यास सुरुवात केली. तसेच मी पॉवरफुल व्यक्ती असून पोलिसांचा खास असल्याचे सांगून खोट्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवली.
advertisement
संबंधित ग्राहकासोबत शारीरिक संबंधाला नकार दिला. मात्र, इथे सेक्स रॅकेट सुरू असल्याचे माहिती असल्याचे सांगून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याने विवस्त्र केले. त्यानंतर, तीन अनोळखी व्यक्त्ती खोलीत आले. त्यांनी, नग्न अवस्थेमधील फोटो व व्हिडीओ काढले. त्यानंतर संबंधित व्यक्ती आणि अन्य तीन साथीदार निघून गेल्याचा आरोप केला. त्यानुसार, सांताक्रूझ पोलिसांनी त्यांच्या जबाबावरून झिरो एफआयआर नोंदवत चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे छापा टाकण्यापूर्वी आरसीएफ पोलिसांनी कारवाईसाठी बोगस ग्राहक म्हणून याच व्यक्तीला पाठवलं होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 12:53 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
आधी कपडे काढायला लावले, मग अश्लील.., रेड मारायला गेलेल्या व्यक्तीचं थायलंडच्या तरुणीसोबत नको ते कृत्य


