Mumbai Metro 9: दहिसर- मिरा भाईंदर मेट्रोचे लोकार्पण नेमकं कधी होणार? परिवहन मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
अलीकडेच दहिसर- मीरा भाईंदर मेट्रोचे लोकार्पण होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण तो सोहळा पुढे ढकलला आहे. स्वत: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना लोकार्पण सोहळ्याची तारीख सांगितली आहे.
मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मेट्रो लाईन 9 प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा 6 एप्रिलला होणार असल्याची माहिती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत: दिलेली आहे. दहिसर ते काशिगावपर्यंत पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून मेट्रोचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते केले जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ह्या मार्गिकेला अखेर हिरवा सिग्नल मिळाला असून त्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मेट्रो लाईन 9 या नव्या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
माध्यमांसोबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “काही कारणांमुळे मेट्रो सेवेच्या उद्घाटनाला विलंब झाला आहे. दहिसर ते काशिगावपर्यंत मेट्रो सेवा संपूर्णपणे तयार होती, पण सुरक्षा प्रमाणपत्र उपलब्ध झालेलं नव्हतं. जे आता एमएमआरडीएला उपलब्ध झालेले आहे. आता या मार्गाच्या उद्घाटनाची तारीख 6 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक मुंबई मेट्रो 9 केव्हापासून सुरू होणार? याच्या प्रतिक्षेत होते. पण आता ही मेट्रो सुरू झाल्यानंतर नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार, हे मात्र नक्की.” मेट्रो लाईन 9 मार्गिका सुरू होणार असल्यामुळे नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
13.58 कि.मीची ही संपूर्ण मेट्रो लाईन 9 ही मार्गिका असणार आहे. दहिसर पूर्व ते मीरा- भाईंदरपर्यंत ही मेट्रो धावणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त चार स्टेशनपर्यंतच मेट्रो धावणार आहे. दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशीगाव अशा चार मेट्रो स्थानकांवरच ही मेट्रो धावणार आहे. त्यापुढील मार्गिकेंचे काम अद्याप पूर्ण झालेले नाहीत. दरम्यान, मेट्रो लाईन 9 च्या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा उपस्थित राहणार आहेत. शिवाय, शहरातील लोकप्रतिनिधी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 7:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro 9: दहिसर- मिरा भाईंदर मेट्रोचे लोकार्पण नेमकं कधी होणार? परिवहन मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली







