ए.आ.रहमानची आवडती गायिका, गायली 10,000 गाणी; वयाच्या 34 व्या वर्षी चटका लावणारी एक्झिट, हळहळली होती इंडस्ट्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
संगीतकार ए आर रहमान यांची आवडती गायिका. जिनं 10,000 हून अधिक गाणी गायली. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला.
advertisement
advertisement
advertisement
स्वर्णलता यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी सर्वाधिक गाणी गायली असली तरी हिंदी संगीतप्रेमींमध्ये त्यांची लोकप्रियता कायम राहिली. 'नीतिक्कू थंडनाई' या चित्रपटात के. जे. येसुदास यांच्यासोबत 'चिन्नचिरू किलिये' हे प्रसिद्ध गाणे गायल्यानंतर स्वर्णलता प्रकाशझोतात आल्या. यानंतर स्वर्णलता घराघरात पोहोचल्या. त्यांनी अगदी लहान वयातच संगीत क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं.
advertisement
advertisement
advertisement
संपूर्ण जग स्वर्णलता यांच्या गाण्यांनी मोहित झाले होते. स्वर्णतला यांनी हिंदी गाणी खूप कमी गायली पण जी गायली ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. उर्मिला मातोंडकरचं 'हाय रामा ये क्या हुआ' हे गाणं स्वर्णलता यांनी गायलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी अनेक गाण्यांमध्ये हमिंग केलं आहे जे ऐकणाऱ्या प्रत्येकाला मंत्रमुग्ध करतं.
advertisement






