Navi Mumbai News: बारमध्ये डान्स करताना बारबालाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
कोपर खैरणे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या एका डिस्को बारमध्ये डान्स करणाऱ्या बारबालाचा अचानक मृत्यू झाला आहे. तात्काळ तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
कोपर खैरणे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोपर खैरणे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या डिस्को बारमध्ये डान्स करणाऱ्या एका बारबालाचा अचानक मृत्यू झाला आहे. तात्काळ तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. रूग्णालयात उपचाराअंती बारबालाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सध्या पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून चौकशीअंती आणखी काही माहिती समोर येते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे.
कोपर खैरणे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिस्को बारमध्ये डान्स करणाऱ्या एका बारबालाची अचानक तब्येत बिघडली आणि काही काळानंतर तिचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, डान्स करत असताना तिला हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या सहकाऱ्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले, परंतू त्या आधीच तिचा मृत्यू झाला होता. परंतू डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, आदर्श बार अँड रेस्टॉरंटमध्ये कोपर खैरणे पोलीसांची टीम अधिकाधिक घटनेची सखोल चौकशी करत आहे. तपासाअंती पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळालीये.
advertisement
पोलिसांनी केलेल्या तपासात असे स्पष्ट झाले की, बारबाला कोपर खैरणे येथील सेक्टर १९ मध्ये ओळखीच्या लोकांसोबत राहत होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, त्या बारबालाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्या बारबालाच्या ओळखीच्यांचे असे म्हणणे आहे की, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच कळू शकेल, परंतु पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेमुळे तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांवरही शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या बारबालाच्या पार्थिवाचं पोस्टमार्टम करण्यात आलं नाही. बारबालाच्या कुटुंबीयांकडून शवविच्छेदनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 6:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai News: बारमध्ये डान्स करताना बारबालाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी






