सकाळच्या वापरात डिस्काऊंट, मोबाईलवर रिडिंग पाहता येणार; महावितरणचं वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटर आहे तरी काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ग्राहकांना आधी वीज वापरायला मिळणार असून त्यानंतर त्याचं वीज बिल भरावं लागणार आहे. अर्थात ग्राहकांना त्यांच्या घरातील विजेचं मीटर बदली करावं लागणार आहे. त्यानंतरच त्यांना नव्या सुविधेचा फायदा घेता येणार आहे.
नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वीजबील आता आणखीन महाग होण्याची शक्यता आहे. कारण महावितरण आता वीज ग्राहकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना आधी वीज वापरायला मिळणार असून त्यानंतर त्याचं वीज बिल भरावं लागणार आहे. अर्थात ग्राहकांना त्यांच्या घरातील विजेचं मीटर बदली करावं लागणार आहे. त्यानंतरच त्यांना नव्या सुविधेचा फायदा घेता येणार आहे.
नव्या मीटरचं नाव स्मार्ट टीओडी मीटर असं असून महावितरणकडून ग्राहकांना हे मीटर मोफत लावून देण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या मीटरचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना बसणार नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही; तर पोस्टपेड असणार आहे. आधी वीज वापरा, मग मासिक बिल भरा, अशी टीओडी मीटरची सध्याची बिलिंग पद्धत आहे, अशी माहिती महावितरणने दिली आहे. दरम्यान, स्मार्ट मीटरसाठी वेगळे दर आकारले जाणार आहेत. सर्वांसाठी जे दर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केले आहेत, तेच कायम लागू राहतील.
advertisement
मात्र, स्मार्ट मीटर असल्यास सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान ग्राहकांना प्रति युनिट सवलत मिळेल. स्मार्ट मीटरसाठी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. नियमित वीज बिल वसुलीतूनच ते पैसे देण्यात येणार असल्याने त्याचा कोणत्याही कर्जस्वरूपातील भुर्दंड ग्राहकांवर पडणार नाहीत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षासाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती वापरासाठी असलेल्या ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलतीचा प्रत्यक्ष फायदा 1 जुलैपासून सुरू आहे. वीज दर सध्याच्या कालावधीसाठी लागू असून ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
advertisement
स्मार्ट मीटरमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंगद्वारे ग्राहकांना अचूक बिल मिळेल, घरातील विजेचा वापर ग्राहकांना मोबाइलवर पाहता येणार आहे, शिवाय, अनेक ग्राहकांच्या वीज वापरावर थेट नियंत्रण देखील येईल, मासिक रीडिंग स्वयंचलित असेल, मशीनमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसणार, अनेक ग्राहकांच्या बिलिंगबाबतीत कायम ज्या तक्रारी येत होत्या त्या आता संपुष्टात येईल, सोबतच ग्राहकांना वीजवापराबद्दल नियोजन करता येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
सकाळच्या वापरात डिस्काऊंट, मोबाईलवर रिडिंग पाहता येणार; महावितरणचं वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटर आहे तरी काय?











