advertisement

आईचं छत्र हरपलं अन् बापानेच दिला नरकवास! मिरा रोडमध्ये चिमुरड्यावर अमानुष अत्याचार; इस्त्रीने दिले चटके

Last Updated:

नऊ वर्षाच्या चिमुकलल्या इस्त्रीचे चटके देऊन जखमी केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

News18
News18
विजय देसाई, प्रतिनिधी
मुंबई: मिरा रोड मध्ये एका नराधम बापाने आपल्या मुलाला खोलीत बंदी बनवून त्याला इस्त्रीचे चटके आणि काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षाच्या चिमुकलल्या इस्त्रीचे चटके देऊन जखमी केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एवढच नाही तर नराधम बापाने आपल्या पोटच्या पोराला एका गुलामासारखे कैद करून ठेवलं होतं.
advertisement
मिरा रोड मध्ये राहणारा धीरज शर्मा याला एक मुलगा झाला त्याच नाव दिव्यांश शर्मा ९ वर्ष असून त्याची आई अताशी शर्मा हीचे मार्च 2024 मध्ये निधन झाले. दिव्यांशच आईचं छत्र हरवल्यानंर दिव्यांश त्याचे वडील धीरज शर्मा यांच्याकडे राहू लागला होता. दिव्यांशला अभ्यासाची फारशी गोडी नव्हती. थोडीफार चूक केल्यानंतर धीरज त्याला मोठमोठ्या काठीने आणि इस्त्रीचे चटके देऊन मारहाण करत होता. ही इतकी अमान होती की कोणाचाही काळीज हेलावल्या शिवाय राहणार नाही.
advertisement

कसा करायचा लेकाचा जाच? 

दिव्यांशवर तो घराच्या बाहेर गेल्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत लक्ष ठेवायचा मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत झोपायचं नाही.. अभ्यास करत राहायचं त्या सीसीटीव्हीमध्ये बघून जर तो झोपायला गेला किंवा अजून काही करत असेल तर त्याला तिथूनच ओरडायचा. अनेक दिवस तो एखाद्या तुरुंगवास भोगावा तसा तुरुंगवास त्याचे लेकाने भोगाला. धीरजने सुरजला शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवले होते.
advertisement

नराधम बापाला अद्याप अटक नाही

सुरतच्या एका गुरुकुलमध्ये शिकण्यासाठी ठेवले होते मात्र तो सुट्टी पडल्यामुळे घरी आला होता. यावेळी हा संपूर्ण प्रकार नराधम धीरजने केला आहे. हा बाप नव्हे हा राक्षस आहे अशा राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा देवी अशी मागणी दिव्यांच्या आजीने केली आहे. दरम्यान नवघर पोलिसांनी याप्रकरणी आजीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चटके दिलेले इस्त्री जप्त केली आहे. नवीन कायद्यानुसार या नराधम बापाला नोटीस देऊन कारवाई करण्यात आली आहे मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
आईचं छत्र हरपलं अन् बापानेच दिला नरकवास! मिरा रोडमध्ये चिमुरड्यावर अमानुष अत्याचार; इस्त्रीने दिले चटके
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement