advertisement

T20 World Cup : सलमान आघाच्या पत्नीसोबत घृणास्पद कृत्य, पाकिस्तानला सहन झाला नाही इंग्लंडविरुद्धचा पराभव

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यामध्ये पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्ध 2 विकेटने पराभव झाला आहे, या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमवर त्यांच्याच चाहत्यांकडून टीकेची झोड उठली आहे.

सलमान आघाच्या पत्नीसोबत घृणास्पद कृत्य, पाकिस्तानला सहन झाला नाही इंग्लंडविरुद्धचा पराभव
सलमान आघाच्या पत्नीसोबत घृणास्पद कृत्य, पाकिस्तानला सहन झाला नाही इंग्लंडविरुद्धचा पराभव
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यामध्ये पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्ध 2 विकेटने पराभव झाला आहे, या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमवर त्यांच्याच चाहत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. टीमचा पराभव सहन न झाल्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांनी कर्णधार सलमान आघा याची पत्नी आणि त्याच्या मुलांना शिवीगाळ केली आहे. या टीकेला सलमान आघाच्या पत्नीने प्रत्युत्तर दिलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा 2 विकेटने पराभव झाला, शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानने सामना गमावला, त्यामुळे पाकिस्तानचं सेमी फायनलला पोहोचणं कठीण झालं, त्यामुळे हा पराभव पाकिस्तानी चाहत्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी सलमान आघाच्या पत्नीला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या मेसेजमध्ये जाऊन शिवीगाळ केली.
advertisement
सोशल मीडियावरून होत असलेल्या शिवीगाळीला सलमान आघाच्या पत्नीने प्रत्युत्तर दिलं आहे. सलमान आघाच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. 'मला आणि माझ्या मुलाला शिवीगाळ करून पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकणार आहे का?' असा प्रश्न सलमान आघाच्या पत्नीने विचारला आहे.
इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलपर्यंतचा मार्ग कठीण झाला आहे. पाकिस्तान सुपर 8 च्या ग्रुप बी मध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली आहे. पाकिस्तान सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडलेली नाही, पण त्यांच्या शक्यता कमी झाल्या आहेत. पाकिस्तानला आता श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सुपर 8 सामना चांगल्या फरकाने जिंकावा लागेल, पण न्यूझीलंडच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागेल. न्यूझीलंडने त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकले तर मात्र पाकिस्तानचं आव्हान सुपर-8 मध्येच संपुष्टात येईल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सलमान आघाच्या पत्नीसोबत घृणास्पद कृत्य, पाकिस्तानला सहन झाला नाही इंग्लंडविरुद्धचा पराभव
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement