Fishing: चवीनं मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, दर वाढणार, मच्छिमारांसाठी सरकारनं जाहीर केले नवे नियम
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Fishing Ban: अरबी समुद्रात 2 महिन्यांसाठी मासेमारी बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जूनपासून ही बंदी लागू असणार असल्याचे आदेश मत्स्य विभागाने दिले आहेत.
रायगड : कोकण किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 जूनपासून 2 महिन्यांसाठी मासेमारी बंद राहणार आहे. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो, तसेच या काळात समुद्र देखील खवळलेला असतो. त्यामुळे मस्त्य विभागाने नियमावली जाहीर केली असून 1 जून ते 31 जुलैदरम्यान यंत्रचलित व यांत्रिक नौकांना समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आलीये.
काय आहे नियमावली?
पावसाळ्यात यंत्रचलित व यांत्रिक नौकांसाठी मासेमारी करण्यास बंदी असणार आहे. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका 1 जूनपूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक असेल. 31 जुलै किंवा त्यापूर्वी कोणत्याही यांत्रिक नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण आणि मार्गदर्शक सूचना आदेश लागू राहतील.
advertisement
तर कारवाई होणार
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी आहे. त्यामुळे या कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास नौका, नौकेवर बसविलेली उपसाधने, तसेच मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल.
पारंपरिक मासेमारीला बंदी नाही
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या आणि बिगर- यंत्रचलित नौकांना ही बंदी लागू नाही. या नौकांच्या माध्यमातून पारंपरिक मासेमारी सुरू राहणार असल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान, पावसाळ्यात माशांचे प्रजनन होत असते. या काळात मासेमारी केल्यास प्रजनन झालेलेल मासे जाळ्यात आल्याने मासेमारी कमी होऊ शकते. त्यामुळे यांत्रिक आणि यंत्रचलित नौकांना मासेमारी बंदी घालण्यात आल्याचे रायगड मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त संजय पाटील यांनी सांगितले.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
May 22, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Fishing: चवीनं मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, दर वाढणार, मच्छिमारांसाठी सरकारनं जाहीर केले नवे नियम








