Janjira Fort: आदेश आला! जंजिरा किल्ला 26 मेपासून बंद, पण कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Janjira Fort: पावसाळी पर्यटनासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 26 मेपासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
रायगड: महाराष्ट्रातील प्रसिद्ध जलदुर्ग जंजिरा हा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. पावसाळ्याच्या हंगामामुळे 26 मेपासून 31 ऑगस्टपर्यंत जंजिरा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत पुरातत्त्व संशोधन विभागाचे अधिकारी बजरंग लीकर यांनी माहिती दिली.
मुरुड तालुक्यात ऐतिहासिक जंजिरा हा सागरी किल्ला आहे. दरवर्षी समुद्रातील सुरक्षिततेच्या कारणामुळे या किल्ल्यात पर्यटकांना बंदी करण्यात येते. पावसाळी वातावरणात समुद्र खवळलेला असतो. बऱ्याचदा मोठ्या लाटा उसळत असल्याने पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी शासकीय स्तरावरून निर्णय घेतला जातो.
यंदा 26 मेपासून पर्यटकांसाठी किल्ल्याचे दरवाजे बंद करावेत, असे आदेश मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्त्व संशोधन खात्याला प्राप्त झाले आहेत. त्या नुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती येलीकर यांनी दिली.
advertisement
दरम्यान, जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. ऐतिहासिक दृष्ट्या हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता 31 ऑगस्टपर्यंत हा किल्ला बंद राहणार आहे. त्यामुळे जंजिरा येथे पर्यटनाचा प्लॅन करणाऱ्यांना 31 ऑगस्टची वाट पाहावी लागेल.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
May 22, 2025 7:36 AM IST









