advertisement

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार; जाणून घ्या वेळापत्रक

Last Updated:

गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्यरात्री सुद्धा प्रवास करता यावा यासाठी मेट्रोने विशेष सेवा जाहीर केली आहे.

Mumbai Metro Timetable: मुंबईकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार; जाणून घ्या वेळापत्रक
Mumbai Metro Timetable: मुंबईकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार; जाणून घ्या वेळापत्रक
मुंबईमध्ये गणेशोत्सवाची क्रेझ फार मोठ्या प्रमाणावर आहे. मुंबईतल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. आता अशातच या सर्व गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्यरात्री सुद्धा प्रवास करता यावा यासाठी मेट्रोने विशेष सेवा जाहीर केली आहे. मेट्रो लाईन २ ए आणि मेट्रो लाईन ७ च्या वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे. गणेशभक्तांसाठी मुंबई मेट्रो नेमकी कितीवाजेपर्यंत सुरु राहणार आहे, जाणून घेऊया...
यंदा गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला आहे. ही मेट्रोची विशेष सेवा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत अशी ११ दिवसांसाठी असणार आहे. गणेशभक्तांना ही मेट्रो सेवा मेट्रो लाईन २ ए (अंधेरी पश्चिम ते दहिसर) आणि मेट्रो लाईन ७ (गुंदवली ते दहिसर) या परिसरामध्ये उपलब्ध असणार आहे. मेट्रो लाईन २ ए आणि मेट्रो लाईन ७ च्या मार्गिकेवरील मेट्रो सेवा सामान्य काळात रात्री ११ वाजेपर्यंत सुरु असते. ती आता गणेशोत्सव काळात मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी मेट्रो सर्वात सुरक्षित, जलद प्रवासाचा पर्याय ठरणार आहे. मुंबई मेट्रोच्या या निर्णयामुळे मुंबईतील भाविकांना गणरायाच्या दर्शनासाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
advertisement
मुंबई मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोच्या सामान्य काळात तीनशे हून अधिक फेऱ्या होत होत्या, आता गणेशोत्सव काळात त्याहून अधिक होणार आहेत.
विस्तारित वेळापत्रक
• सोम–शुक्र: ३१७ फेऱ्या (आधीपेक्षा १२ फेऱ्या जास्त)
• शनिवार: २५६ फेऱ्या (आधीपेक्षा १२ फेऱ्या जास्त)
advertisement
• रविवार: २२९ फेऱ्या (आधीपेक्षा १२ फेऱ्या जास्त, आवश्यकतेनुसार अतिरिक्त फेऱ्या शक्य)
advertisement
मेट्रो सेवा किती मिनिटांनी?
• सोम–शुक्र: गर्दीच्या वेळी: दर ५.५० मिनिटांनी एक गाडी. | इतर वेळी: दर ९:३० मिनिटांनी
• शनिवार: गर्दीच्या वेळी : दर ८.०६ मिनिटांनी एक गाडी | इतर वेळी: दर १०.२५ मिनिटांनी
• रविवार : दर १० मिनिटांनी एक गाडी (अतिरिक्त सेवा शक्य)
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार; जाणून घ्या वेळापत्रक
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement