Traffic Rules: सणासुदीच्या काळात खिशाला बसणार कात्री, PUC चेक करा, नाहीतर बसेल मोठा दंड
- Published by:Kranti Kanetkar
- local18
Last Updated:
Mumbai Traffic Rules: सणासुदीच्या काळात खिशाला बसणार कात्री, एक डॉक्युमेंट मिस झालं तर बसेल मोठा दंड
सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत. या सणासुदीच्या दिवसांमध्ये कदाचित तुमच्या खिशाला भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. जर तुम्ही वाहनधारक असाल तर तुम्हाला कदाचित पैसे भरावे लागतील. आता तुम्ही म्हणाल का पैसे भरायचे आम्ही ? कारण काय ? तुम्हाला याचं नेमकं कारण सांगतो... जर तुमचं वाहन धुर ओकत असेल तर, तुमच्यावर प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करु शकतं. सध्याच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये वाहनचालकांसाठी ही एक प्रकाची डोकेदुखीच आहे. सणासुदीच्या दिवसांत जर तुम्ही शॉपिंग करायला जात असाल तर जवळच्या पेट्रोल पंपावर किंवा एका पीयूसी सेंटरवरून तुम्ही तुमची पीयूसी काढून घ्या. सध्या प्रादेशिक परिवहन विभाग प्रदुषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहे.
मुंबईतील वडाळा प्रादेशिक परिवहन विभाग सध्या शहरामध्ये प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहे. आतापर्यंत वडाळा आरटीओने दोषी आढळलेल्या दोन हजाराहून अधिक वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून एकूण लाखो रूपयांचा दंड वसूल केला आहे. तर इतर दोषी वाहनचालकांवरही आरटीओ सध्या कारवाई करत आहे.
शहरामधील वाढते प्रदूषण लक्षात घेता वडाळा आरटीओने १ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान आठ हजार ६५० वाहनांची पीयूसी तपासली. यातील दोन हजारहून अधिक वाहनांवर आरटीओने कारवाईचा बडगा उचलला आहे. यातून आरटीओने २१ लाख ५७ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. आरटीओकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये कारवाईवेळी ज्या वाहनधारकांनी पीयूसी सर्टिफिकेट दाखवले नाही, त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यासोबतच ज्यांचे वाहन मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये वायू प्रदूषण करत होते. त्यांच्यावरही आरटीओने कारवाई केली आहे. जर तुमच्याही दुचाकीची किंवा चारचाकीची पीयूसी नसेल तर आत्ताच ती काढून घ्या. अन्यथा तुमच्यावरही आरटीओकडून कारवाई करण्यात येईल.
advertisement
जर तुम्हाला सुद्धा या कायदेशीर कचाट्यातून वाचायचं असेल, तर सर्वात आधी आपल्या वाहनाचे सर्व कागदपत्र काढून ठेवा. शिवाय जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर कायम हेल्मेटचा वापर करा आणि चारचाकी चालवत असाल तर, सीटबेल्टचा वापर करत राहा. आपण नियमांनुसार राहिल्यास आपल्यावर आरटीओकडून कारवाई होणार नाही. वेळोवेळी आरटीओकडून कार्यालयांकडून वाहनांचे कागदपत्रे, इन्शुरन्स, वाहनाचा वैध परवाना, फिटनेस, प्रदूषण नियंत्रण सर्टिफिकेट - PUC अशा कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 23, 2025 2:42 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Traffic Rules: सणासुदीच्या काळात खिशाला बसणार कात्री, PUC चेक करा, नाहीतर बसेल मोठा दंड







