पासपोर्टसाठी तासनतास रांगेत उभा राहायची गरज नाही! आता घरातूनच काढा E-Passport
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
E-Passport Seva: भारत सरकारने पासपोर्टबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता घरबसल्या ई-पासपोर्ट काढता येणार आहे. अर्ज कसा करायचा जाणून घेऊ.
मुंबई: भारतातील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. भारत सरकारने ई-पासपोर्ट ही आधुनिक आणि सुरक्षित सेवा सुरू केली आहे. पारंपरिक पासपोर्टच्या तुलनेत हा पासपोर्ट अधिक प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, यामध्ये एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक चिप बसवलेली असते. या चिपमध्ये प्रवाशाची वैयक्तिक माहिती, फोटो आणि बायोमेट्रिक तपशील सुरक्षितरित्या जमा असते. त्यामुळे बनावट ओळख, पासपोर्ट स्कॅम यासारख्या प्रकारांपासून बचाव होतो.
आता पासपोर्ट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभ रहावं लागणार नाही. नागरिक आता या पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
कशी आहे अर्ज प्रक्रिया?
नागरिकांनी passportindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रथम नोंदणी करावी. त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करावे. वेबसाईटवर "Apply for Fresh Passport / Re-issue of Passport" या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरवा. जुना पासपोर्ट असल्यास ई-पासपोर्टसाठी Re-issue of Passport हा पर्याय निवडावा. अर्ज सबमिट केल्यानंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी अपॉइंटमेंट बुक करावी लागते. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने आवश्यक फी भरावी लागते.
advertisement
अपॉइंटमेंटच्या दिवशी PSK (पासपोर्ट सेवा केंद्र) मध्ये जाऊन आवश्यक मूळ कागदपत्रे (जसे की – आधार कार्ड, जुना पासपोर्ट, पत्त्याचा पुरावा) सादर करावे लागतात. पासपोर्ट कार्यालयात तुमचा फोटो, बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) घेतले जातात व मुलाखत घेतली जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि पोलीस व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यावर, चिपसह सुसज्ज ई-पासपोर्ट पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवण्यात येतो.
advertisement
ई-पासपोर्टमुळे बरेच फायदे होतात. सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षा वाढते. चिपमध्ये प्रवाशाची माहिती, फोटो, बायोमेट्रिक डेटा (उदा. फिंगरप्रिंट्स) सुरक्षितपणे स्टोअर केलेला असतो, ज्यामुळे बनावट पासपोर्ट तयार करणे कठीण असते. तसेच चिप स्कॅन करून प्रवाशाची ओळख पटवली जाऊ शकते, त्यामुळे विमानतळांवर वेळ वाचतो.
ई-पासपोर्ट ICAO (International Civil Aviation Organization) मानकांनुसार तयार केला जातो, त्यामुळे तो जगभर मान्य असतो. चिपमध्ये डिजिटल माहिती असल्यामुळे चुकीची किंवा चुकीने टाकलेली माहिती टाळता येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 29, 2025 12:58 PM IST