advertisement

T20 World Cup : स्पेनला निघाला पण मुंबईत लँड झाली फ्लाईट! सूर्यकुमारच्या एका फोनने सुत्र हालली, रात्री 3 वाजता टीम इंडियात कुणाची एन्ट्री?

Last Updated:

Mohammed Siraj Entry Story in T20 World Cup : शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी रात्री 3 वाजता सिराज मुंबईतील टीम हॉटेलमध्ये पोहोचला आणि अवघ्या काही तासांतच तो अमेरिकेविरुद्ध प्लेइंग-11 मध्ये खेळला.

Mumbai How Mohammed Siraj Entred in T20 World Cup squad
Mumbai How Mohammed Siraj Entred in T20 World Cup squad
IND vs USA, T20 World Cup : नशिबी लिहिलेलं बदलू शकत नाही, असं म्हणतात. टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याच्यासाठी गेल्या 24 तासांत नशिबानं मोठं वळण घेतलं. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या मोहिमेतून सिराज जवळपास बाहेरच होता, मात्र एका रात्रीत त्याच्या नशिबाचे 'तिकीट' बदललं. सिराजने माद्रिदला (Madrid) जाऊन ला-लिगा फुटबॉल मॅच पाहण्याचे प्लॅनिंग केलं होतं, पण एका फोनने त्याचा सगळा प्लॅन बदलून त्याला थेट टीम इंडियाच्या जर्सीत मैदानात उतरावं लागलं.

रात्री 3 वाजता हॉटेलमध्ये पोहोचला

शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी रात्री 3 वाजता सिराज मुंबईतील टीम हॉटेलमध्ये पोहोचला आणि अवघ्या काही तासांतच तो अमेरिकेविरुद्ध प्लेइंग-11 मध्ये खेळला. कॅप्टन सूर्यकुमार यादवने त्याला मेसेज करून 'मियां, बॅग पॅक करून निघ' असं सांगितलं आणि सिराजने तातडीने मुंबई गाठली. या कमबॅकबद्दल बोलताना सिराज भावूक झाला आणि त्याने सूर्याला घट्ट मिठी मारली, कारण दोघांची खूप दिवसांनी भेट झाली होती.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Team India (@indiancricketteam)



advertisement

कोणालाच वाटलं नव्हतं...

सूर्या भाई ने बोला आने का, तो आने का... असं म्हणत मोहम्मद सिराजने आपल्या भावना व्यक्त केल्या. सिराजने जुलै 2024 नंतर एकही टी-ट्वेंटी इंटरनॅशनल मॅच खेळली नव्हती, त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र, नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलेलं होतं. त्याने अर्शदीप सिंगसोबत नवीन बॉलने भेदक मारा केला. सिराजने आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये 2 विकेट्स घेत अमेरिकेची अवस्था 13 धावांवर 3 बाद अशी बिकट करून टाकली.
advertisement

मुख्य बॉलर म्हणून दिसेल का?

दरम्यान, वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये टीमला विजय मिळवून दिल्यानंतर सिराज आता पूर्णपणे आत्मविश्वासात दिसत आहे. त्याने मोमेंटम कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला असून चाहत्यांनी त्याच्या या अनपेक्षित कमबॅकचे जोरदार स्वागत केले आहे. सिराजच्या या कामगिरीनंतर तो पुढच्या मॅचमध्येही मुख्य बॉलर म्हणून दिसेल का? असा सवाल विचारला जातोय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : स्पेनला निघाला पण मुंबईत लँड झाली फ्लाईट! सूर्यकुमारच्या एका फोनने सुत्र हालली, रात्री 3 वाजता टीम इंडियात कुणाची एन्ट्री?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement