advertisement

Pune Crime: शेखरवर अनेक गुन्हे अन् 4 महिन्यांपासून फरार; पण 'तिला' भेटण्याची ओढ पडली महागात, पुण्यात आला अन् गेम झाला

Last Updated:

शेखरवर खंडणी, जबरी चोरी, प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.तो वडगाव येथे आपल्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.

फरार आरोपीला अटक (AI Image)
फरार आरोपीला अटक (AI Image)
पुणे : गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण करू पाहणारा आणि गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा 'मकोका'मधील खतरनाक आरोपी अखेर जाळ्यात अडकला. आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तो गुपचूप वडगाव परिसरात आला खरा, पण तिथे आधीच दबा धरून बसलेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २८, रा. कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेखरवर खंडणी, जबरी चोरी, प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली होती, तेव्हापासून तो फरार होता. तो वडगाव येथील प्रयेजा सिटी परिसरातील एस.आर.ए. बिल्डिंगजवळ आपल्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.
advertisement
पोलिसांचा 'मास्टर प्लॅन' आणि अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात सापळा रचला. शेखर तिथे पोहोचताच पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने त्याला वेढा घातला. चार महिने पोलिसांना गुंगारा देणारा शेखर या 'सापळ्यात' अलगद अडकला.
advertisement
गुन्हेगारी रेकॉर्ड मोठा
शेखर ठोंबरे हा संतोषनगर, कात्रज परिसरातील एक सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्या अटकेमुळे परिसरात चालणाऱ्या संघटित गुन्हेगारीला मोठा लगाम बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही धाडसी कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक नीलेश मोकाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: शेखरवर अनेक गुन्हे अन् 4 महिन्यांपासून फरार; पण 'तिला' भेटण्याची ओढ पडली महागात, पुण्यात आला अन् गेम झाला
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement