advertisement

काय तो वेग अन् काय तो प्रवास, कसारा ते मनमाड अंतर आता विक्रमी वेळेत पूर्ण होणार; डबल इंजिनची गरज संपणार

Last Updated:

Kasara Manmad Railway Project : प्रवाशांनो लक्ष द्या आता कसारा घाटातील ती समस्या आता कायमची संपणार आहे. मात्र नेमकी कोणती समस्या प्रवासा दरम्यान होती.

Kasara Manmad Railway Project
Kasara Manmad Railway Project
मुंबई : मध्य रेल्वेचा कसारा-मनमाड दरम्यानचा मार्ग सर्वात व्यस्त मानला जातो. यामुळे या मार्गावर काही दिवसांपूर्वी प्रकल्पाचे काम हाती घेण्याचे ठरवले होते, त्यासाठी आता मंजूरी मिळाली आहे. नेमका या प्रकल्पाचा कशा प्रकारे प्रवाशांना फायदा होणार आहे.
रेल्वेचा नवा गेमचेंजर प्रकल्प
मनमाड-कसारा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेलाइनसाठी मंजूरी आता मिळाली आहे त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तब्बल 10,154 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे. सुमारे 135 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे काम पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मार्गातील 'ही' मुख्य समस्या संपणार
मनमाड-कसारा तिसरा आणि चौथा मार्ग सुरू झाल्यानंतर कसारा घाटातील चढ-उताराचा ताण कमी होणार असून गाड्यांना अतिरिक्त इंजिन (बँकर) लावण्याची गरज भासणार नाही. यामुळे तिथे लागणारा वेळ वाचणार आहे.
advertisement
प्रवासाचा वेग दुप्पट होणार
कसारा घाटात गाड्यांचा वेग कमी होणे आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांना सहन करावा लागणारा त्रास आता कमी होणार आहे. यामुळे अंदाजे 25 ते 30 मिनिटांनी कमी होईल. गाड्यांची संख्या वाढवल्याने प्रवासी वाहतूक क्षमता सुमारे 30 टक्क्यांनी वाढणार आहे.
घाटातील वाहतुकीतून प्रदूषण कमी
पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे. कसारा घाटात गाड्यांना कमी ऊर्जा लागल्याने दरवर्षी सुमारे 54 कोटी किलो कार्बन उत्सर्जन घटेल. हा परिणाम तब्बल 2.2 कोटी झाडे लावण्याइतका पर्यावरणाला लाभदायी ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
काय तो वेग अन् काय तो प्रवास, कसारा ते मनमाड अंतर आता विक्रमी वेळेत पूर्ण होणार; डबल इंजिनची गरज संपणार
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement