Konkan Railway: कोकण रेल्वेने प्रवास करताय? आधी बदललेलं वेळापत्रक पाहा, या गाड्या रद्द!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. तर मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत.
मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर मुल्की स्थानकाजवळ तांत्रिक आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी, दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पायाभुत विकास कामांमुळे जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस या गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी दादर पर्यंतच धावणार आहेत.
मुल्की स्थानकाजवळ पॉइंट बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20646) मंगळुरू सेंट्रल ते मडगाव या मार्गावर 30 मिनिटे उशिराने धावेल. तसेच, मडगाव-मंगळुरू सेंट्रल मेमू (गाडी क्रमांक 10107) ही गाडी सुमारे 20 मिनिटे उशिराने पोहोचेल. कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या गाड्या रद्द
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे फलाट क्रमांक 12 आणि 13 विस्तारीकरणाच्या कामांमुळे काही गाड्यांचे अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वेळापत्रक पाहावं लागणार आहे.
कसं असेल वेळापत्रक?
- 1. मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस (12134) ही गाडी फक्त ठाण्यापर्यंतच धावेल, आणि ठाणे-सीएसएमटी दरम्यानची सेवा 28 फेब्रुवारीपर्यंत रद्द राहील.
- मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस (22120) आणि मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (12052) या दोन्ही गाड्या फक्त दादरपर्यंत धावतील, आणि दादर-सीएसएमटी सेवा 28 फेब्रुवारीपर्यंत रद्द राहील.
advertisement
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलांची नोंद घेऊन प्रवासाची पूर्वतयारी करण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी अधिकृत रेल्वे वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 18, 2025 10:02 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway: कोकण रेल्वेने प्रवास करताय? आधी बदललेलं वेळापत्रक पाहा, या गाड्या रद्द!