लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीआधी भीषण अपघात, 2 चिमुकल्यांना चिरडलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले, दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू, तिचा भाऊ गंभीर जखमी, आरोपी फरार, पोलिस तपास सुरू.
गणपती विसर्जनाची धामाधून सुरू आहे. डोळे पाणवलेले आणि जड अंत:करणाने बाप्पाला आज 10 दिवसांनंतर निरोप दिला जात आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. या विसर्जन मिरवणुकीआधीच गालबोट लागलं. लहान मुलांमध्ये देव पाहिला जातो. मात्र या विसर्जन मिरवणुकीआधी चिमुरड्यांनाच चिरडल्याची घटना समोर आली आहे.
दहा दिवसांच्या जल्लोषानंतर बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जात आहे. सकाळपासून मुंबईत विसर्जन मिरवणुकीची धामधूम सुरू आहे. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजूच्या मार्गावर अज्ञात वाहनाने 2 चिमुकल्यांना चिरडत नेलं. या अपघातात 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर तिचा 11 वर्षांचा भाऊ गंभीर जखमी असून त्याला परळमध्ये केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
advertisement
अज्ञान वाहनाने चिमुकल्यांना चिरडल्यानंतर तिथून चालक फरार झाला. फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार ही धक्कादायक घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. आरोपीनं या दोन चिमुकल्यांना चिरडल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरुन फरार झाला. हा अपघात कसा झाला याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. ढोलताशांच्या गजरात बाप्पाला मनोभावे निरोप दिला जात आहे. त्याआधीच ही भीषण दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीविरोधात तपास सुरू केला आहे. विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 11:29 AM IST