महाराष्ट्र सरकारकडून उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर, Share Market सुरू राहणार का? BSEने दिले अपडेट

Last Updated:

Public Holidays: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त महाराष्ट्रात 8 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तरीही भारतीय शेअर बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

News18
News18
मुंबई: महाराष्ट्र सरकारने सोमवार 8 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी अधिसूचना जारी केली. मुस्लिम समाजातर्फे काढल्या जाणाऱ्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबी, ज्याला ईद मिलाद-उन-नबी असेही म्हणतात, हा पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 
advertisement
विशेषतः सुफी आणि बरेलवी समुदायांकडून हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि मुस्लिम समाजासाठी याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्यामुळेच सरकारने मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात ही सुट्टी जाहीर केली आहे.
शेअर बाजारावर सुट्टीचा परिणाम नाही
या सार्वजनिक सुट्टीचा भारतीय शेअर बाजारावर कोणताही परिणाम होणार नाही. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दोन्ही सोमवार 8 सप्टेंबर रोजी सुरू राहतील आणि ट्रेडिंग नियमितपणे सुरू राहील.
advertisement
गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर (bseindia.com) ‘ट्रेडिंग हॉलिडेज’ टॅबमध्ये संपूर्ण वर्ष 2025 च्या सुट्ट्यांची यादी उपलब्ध आहे. बीएसई आणि एनएसईच्या 2025 च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात कोणताही पूर्वनियोजित सुट्टीचा दिवस नाही.
2025 मधील उर्वरित शेअर बाजार सुट्ट्या
2 ऑक्टोबर (गुरुवार): गांधी जयंती - दसरा
advertisement
21 ऑक्टोबर (मंगळवार): दिवाळी - लक्ष्मी पूजन
22 ऑक्टोबर (बुधवार): दिवाळी - बलिप्रतिपदा
5 नोव्हेंबर (बुधवार): प्रकाश गुरपुरब श्री गुरु नानक देव जी
25 डिसेंबर (गुरुवार): ख्रिसमस
मराठी बातम्या/मनी/
महाराष्ट्र सरकारकडून उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर, Share Market सुरू राहणार का? BSEने दिले अपडेट
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement