Dhananjay Munde: 'पोलिसांना आडनाव लावता येत नाही', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने राजकारण तापलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
धनंजय मुंडेंनी महापुरूष आणि पोलिसांच्या आडनावांवरून उपस्थित केलेल्या मुद्याचा त्यांच्या विरोधकांनी जोरदार समाचार घेतला.
बीड : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील मोठ्या सामाजिक समस्येकडे लक्ष वेधलंय. पोलिसांना त्यांचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? असा प्रश्न मुंडेंनी उपस्थित केलाय. त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. बीड जिल्ह्यात वाढलेल्या जातीयवादाचे परिणाम फक्त समाजातच नव्हे तर सरकारी पातळीवरही दिसताहेत. पोलीसही त्यांचं आडनाव लावू शकत नाही, इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालीय, असे धनंजय मुंडे म्हणाले.
अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात धनजंय मुंडेंनी महापुरूषांवरूनही वक्तव्य केलं. सर्व जातींनी महापुरूषांची वाटणी केल्याचं दृश्य विदारक असल्याचं मुंडेंनी सांगितलं. शिवरायांनी एका जातीचं नव्हे तर रयतेचं राज्य निर्माण केलं होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला फक्त मराठा समाजाने साजरी करायची का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरी करायची का? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? शिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली म्हणून फक्त माळी समाजातील लोकांनी शिक्षण घ्यायचे का..? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का? असा सवाल उपस्थित केला.
advertisement
अंजली दमानियांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल
धनंजय मुंडेंनी महापुरूष आणि पोलिसांच्या आडनावांवरून उपस्थित केलेल्या मुद्याचा त्यांच्या विरोधकांनी जोरदार समाचार घेतला. धनंजय मुंडेंवर बोलणं म्हणजे वेळ वाया घालणं, असा टोला मनोज जरांगे पाटलांनी लगावला. मराठा समाजाच्या वाट्याला जावू नका, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. तर दोष आडनावात नसतो, असं म्हणत अंजली दमानियांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला.
advertisement
जातीयवाद प्रचंड प्रमाणात वाढला
बीड जिल्ह्यात मागील काही वर्षात जातीयवाद प्रचंड प्रमाणात वाढलाय. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी व्होट बँकेचं राजकारण टाळून सामाजिक भान जपत सर्व समाजात सौहार्द कसा निर्माण होईल? यावर लक्ष देण्याची गरज आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2025 9:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhananjay Munde: 'पोलिसांना आडनाव लावता येत नाही', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने राजकारण तापलं