Weather Alert: बाप्पा गेले अन् वारं फिरलं, सोमवारी हवामानात मोठे बदल, कुठं कोसळणार पाऊस?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Alert: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सोमवारी हवामान आणि पावसाचा अंदाज काय आहे? जाणून घेऊ.
गणेशोत्सवाच्या काळात राज्यात पावसाचा जोर होता. नुकतेच गणेश विसर्जन झाले असून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. उत्तर महाराष्ट्रासह उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवारी, 8 सप्टेंबर रोजी हवामान आणि पावसाची स्थिती कशी राहील? जाणून घेऊ.
advertisement
कोकणासह मुंबईतील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही काळापासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर ओसरणार आहे. सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांत मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 24 तासांसाठी कोणताही सतर्कतेचा इशारा नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement