advertisement

Mumbai Local : वेस्टर्नच्या प्रवाशांना मोठा फटका! गोरेगाव-सीएसएमटी 3 महिने बंद राहणार; कारण काय?

Last Updated:

Mumbai Local Update : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. जिथं नेमका कोणता त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागणार आहे तो जाणून घ्या.

Goregaon CSMT local train suspension 3 months
Goregaon CSMT local train suspension 3 months
मुंबई: मुंबईच्या दैनंदिन प्रवासाचा कणा मानल्या जाणाऱ्या लोकल प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान सुरू असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला वेग देण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा सलग तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाला पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून लवकरच त्याची अधिकृत अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
नेमका कशामुळे घेतला रेल्वेने निर्णय?
या ब्लॉकमागचे मुख्य कारण म्हणजे नव्या मार्गिकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करणे. वांद्रे आणि खार दरम्यान असलेला जुना रेल्वे पूल पाडून त्याची नव्याने पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. सुरुवातीला या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी ठरवण्यात आला होता, मात्र प्रवाशांना होणारी गैरसोय कमी व्हावी यासाठी हा कालावधी तीन महिन्यांवर आणण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पाची काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत डिसेंबर 2027 अशी निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
प्रवाशांची कसरत वाढणार
या ब्लॉकचा थेट फटका लाखो प्रवाशांना बसणार आहे. सध्या गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान 88 तर वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान 106 लोकल फेऱ्या धावतात. या मार्गावरून दररोज सुमारे 3.62 लाख प्रवासी पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेकडे विशेषतहा हार्बर मार्गे, प्रवास करतात. ब्लॉकच्या काळात गोरेगाव ते वांद्रे दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असून वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान मर्यादित सेवा सुरू ठेवण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.
advertisement
दरम्यान हा प्रकल्प रखडण्याचे मुख्य कारण जमीन अधिग्रहणातील अडचणी आणि पुनर्वसनाची कामे वेळेत पूर्ण न होणे हे आहे. महालक्ष्मी-लोअर परेल येथील शक्ती मिलची जमीन न्यायालयीन वादात अडकली आहे. तसेच वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमधील 155 कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. रेल्वे प्रशासनाच्या मते सध्या होणारा तीन महिन्यांचा त्रास सहन केल्यास भविष्यात लोकल सेवा अधिक जलद, वेळेत आणि सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : वेस्टर्नच्या प्रवाशांना मोठा फटका! गोरेगाव-सीएसएमटी 3 महिने बंद राहणार; कारण काय?
Next Article
advertisement
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement