Mumbai : आत्महत्येच्या धमकीने सुरू झालं प्रेम; 2 कोटींची मागणी करत उघडकीस आला डाव; व्यावसायिकासोबत काय घडल?
Last Updated:
Mumbai Crime News : घाटकोपरमध्ये प्रेमाचे नाटक करत एका तरुणीने 58 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळले. पुढे गर्भवती असल्याचा दावा करत तिने थेट 2 कोटींची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात एका 58 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाची प्रेमाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीने आधी प्रेमाचे नाटक करत त्याच्याकडून तब्बल 22 लाख रुपये उकळले. त्यानंतर स्वतः गर्भवती असल्याचे सांगत थेट 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'मी गर्भवती आहे' असं सांगत प्रेमाच्या जाळ्यात अडकवले
तक्रारदार व्यावसायिक घाटकोपरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतात. सन 2022 मध्ये आरोपी तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत घाटकोपर पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये आली होती. त्यावेळी दोघांची ओळख झाली. त्यानंतर तरुणीने व्हॉट्सअॅप कॉल आणि चॅटच्या माध्यमातून सतत संपर्क साधण्यास सुरुवात केली.
तरुणीने तक्रारदाराशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र आपण विवाहित असून दोन मुले असल्याचे सांगत तक्रारदाराने नकार दिला. तरीही तरुणीने आत्महत्या करण्याची धमकी देत संपर्क कायम ठेवला. पुढे तिने घटस्फोट झाल्याचे आणि दोन मुले असल्याचे खोटे सांगून व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला.
advertisement
शेवटी 2 कोटींची मागणी करत उघडकीस आला डाव
view commentsदरम्यान तिने विविध कारणे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी केली. व्यावसायिकाने तिच्यावर विश्वास ठेवून सुमारे 22 लाख रुपये दिले. काही काळानंतर तरुणीने आपण गर्भवती असल्याचे सांगत 2 कोटी रुपयांची मागणी केली. यामुळे संशय बळावल्याने व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 8:42 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : आत्महत्येच्या धमकीने सुरू झालं प्रेम; 2 कोटींची मागणी करत उघडकीस आला डाव; व्यावसायिकासोबत काय घडल?










