advertisement

Narhari Zirwal : '...तर मी 100 टक्के राजीनामा देणार', कारकुनाला अटक झाल्यावर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपवला! म्हणाले...

Last Updated:

Minister Narhari Zirwal staff Clerk Bribe case : माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईल, असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे. मी एवढा मोठा नाही, की मला टार्गेट केलं जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.

Minister Narhari Zirwal staff Clerk Bribe case
Minister Narhari Zirwal staff Clerk Bribe case
Narhari Zirwal Clerk Bribe case : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील विभागाचा कारकून राजेंद्र ढेरंगे यांना लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहाथ अटक केली गेली आहे. झिरवळ यांचे खासगी सचिव (पीएस) रामदास गाडे यांच्याच सांगण्यावरून पैसे मागितले, असा जवाब ढेरंगेने दिल्याने आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले नरहरी झिरवळ?

काल आमच्या मंत्रालयातील एका क्लर्कला ट्रॅप करण्यात आलं. जो प्रकार घडला तो चुकीचा आहे. अनेकांनी आरोप केले की यात वरपर्यंत लिंक आहे. पण माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईल, असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे. मी एवढा मोठा नाही, की मला टार्गेट केलं जाईल, असं अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
advertisement
माझं कार्यालय बंद केलं नाहीये, कार्यालय चालू आहे. अशा प्रकारचं कृत्य होतं, ही जबाबदारी आहेच, नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो. या प्रकरणाची चौकशी व्हावी, असंही नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
advertisement
मुंबईत गेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन आणि या सर्व प्रकरणाविषयी त्यांच्यासोबत चर्चा नक्कीच करेन, पण जो गैरप्रकार झाला आहे, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. कायदेशीर बाब असेल तर त्याला जाब द्यावा लागेल. मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी यांच्याशी त्याच्या तसा थेट संबंध नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Narhari Zirwal : '...तर मी 100 टक्के राजीनामा देणार', कारकुनाला अटक झाल्यावर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपवला! म्हणाले...
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement